बर्थडे स्पेशल; आयुष्मान खुरानाचा आज वाढदिवस

0
207

आयुष्मान खुरानाचा आज वाढदिवस आहे. सांगायचे म्हणजे चित्रपटात येण्याअगोदर आयुष्मान खुराना रेडियो जॉकी म्हणून काम करत होता. बिग एफएमवर त्याचा शो ‘मान न मान, मैं तेरा आयुष्मान’ सुपरहिट झाला होता. एमटीव्हीचा पॉपुलर शो रोडीज जिंकल्यानंतर आयुष्मान खुराना चर्चेत आला. यानंतर आयुष्यामानाने वीजे एमटीव्हीसाठी बरेच शो केले. नंतर वर्ष 2012 मध्ये आयुष्यामानाने चित्रपट ‘विकी डोनर’पासून डेब्यू केला. चित्रपटासाठी आयुष्यमानाला बरेच अवॉर्ड मिळाले होते.

अभिनेता बनवण्यापूर्वी आयुष्यमान खुराणाची एक टीव्ही अँकर म्हणून ओळख होती. आज आयुष्यमना त्याचा 30वा वाढदिवस साजरा करत आहे. 14 सप्टेबर 1984 रोजी पंजाब चंदीगडमध्ये जन्मलेला आयुष्यमान आज बॉलिवूड अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याचे कुटुंबीय आहजी पंजाबमध्ये राहत आहे. कामातून वेळ मिळाला, की तो कुटुंबीयांकडे जातो.

आयुष्यमानचे शिक्षण चंदीगडमध्ये झाले. शालेय शिक्षणानंतर त्याने इंग्लिश लिटरेचरमधून पदवी शिक्षण आणि मास कम्युनिकेशनमधून पदवुत्तर शिक्षण पूर्ण केले. ग्लॅमरस इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी त्याने स्थानीक थिएटरमध्ये 5 वर्षांपर्यंत काम केले होते. यावेळी त्याची भेट ताहिरशी झाली. आयुष्यमानच्या सांगण्यानुसार, ताहिर त्याच्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची तरुणी आहे.

आयुष्यमानने त्याच्या करिअरला एक अँकर म्हणून सुरुवात केली. परंतु त्याला लोकप्रियता आणि ओळख 2004मध्ये आलेल्या एमटीव्ही रोडीजच्या दुस-या पर्वामधून मिळाली. त्यापूर्वी तो दिल्लीमध्ये बिग एफएममध्ये आरजे होता. रेडिओनंतर आयुष्यमान एमटीव्हीच्या अनेक शोमध्ये व्हिडिओ जॉकी बनला आणि लवकरच टीव्हीवर होस्ट म्हणूनसुध्दा झळकला.

2012मध्ये ‘विक्की डोनर’ सिनेमामधून त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री केलीय स्पर्म डोनेशनवर आधारित या सिनेमातून त्याला बरीच पसंती मिळाली. सिनेमात त्याने एक गाणेदेखील गायले आहे. या सिनेमासाठी त्याला फिल्म फेअर अवॉर्ड फॉर बेस्ट मेल डेब्यू आणि गाण्यासाठी फिल्म फेअर अवॉर्ड फॉर बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर हे दोन पुरस्कार त्याला मिळाले आहेत.

२०१३ साली आलेल्या ‘नौटंकी साला’ या चित्रपटाने आयुष्मानचे चित्रपटसृष्टीतील स्थान पक्के झाले. मग मात्र आयुष्मानने मागे वळून पाहिलेच नाही. बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहात राहूनदेखील वेगवेगळ्या विषयांतून सातत्याने प्रेक्षकांसमोर आलेला आयुष्मान हा वेगळ्या वाटेवरील हरहुन्नरी कलाकार आहे. सुरुवातीला काहीशा हलक्या फुलक्या, विनोदी वळणाने जाणाऱ्या अनेक चित्रपटातून जसे ‘विकी डोनर'(२०१२), ‘नौटंकी साला'(२०१३), ‘दम लगाके हैशा'(२०१५). ‘बरेली की बर्फी'(२०१७), ‘शुभमंगल सावधान'(२०१७) आणि ‘बधाई हो(२०१८) यातून त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. हे जवळ जवळ सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. मागील वर्षातला ‘बधाई हो’ हा मला आवडलेला सर्वोत्तम चित्रपट आहे. अर्थात ‘बधाई हो’चं यश आयुष्मान बरोबर त्याचे सहकलाकार, कथेतला वेगळेपणा तसेच सुंदर संवाद यांनाही द्यावं लागेल.

२०१८ साली आलेल्या ‘अंधाधुन’ या चित्रपटाद्वारे आयुष्मानने काहीशा गंभीर, थ्रिलर प्रकारच्या चित्रपटाकडे आपला मोहोरा वळवला. श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘अंधाधुन’ चित्रपटाने आयुष्मानच्याबाबतीतली सारी गणितेच बदलून टाकली. पहिल्यांदाच अशाप्रकारे वेगळ्या भूमिकेतून आलेल्या आयुष्मानच्या या चित्रपटाला तिकीटबारीवरदेखील घवघवीत यश मिळाले. नुकताच तो पुन्हा एकदा ‘आर्टिकल-१५’ या चित्रपटाद्वारे पोलीस अधिकाऱ्याच्या तडफदार भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर आला.