बर्थडे स्पेशल: नाना पाटेकर यांचा आज वाढदिवस

0
344

आज 1 जानेवारी नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा वाढदिवस नाना आज आपला 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 मध्ये रायगड जिल्ह्यात झाला होता. नाना पाटेकर यांनी 4 दशकं बॉलिवूडवर राज्य गाजवलं आहे. एक उत्तम अभिनेता म्हणून त्यांची देशातच नाही तर जगभरातही ओळख आहे. नाना पाटेकर आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्याच्या चित्रपटांचे अनेक संवाद आजही लोकांना आठवतात.

अतिशय यशस्वी अभिनेता असूननी नाना पाटेकर साधं सरळ आयुष्य जगतात. शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी पाटेकरांनी आणि मकरंद अनासपुरे यांनी मिळून नाम ही संस्था सुरू केली आहे. आजपर्यंत अनेकांना या संस्थेद्वारे मदत मिळाली आहे.करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाना पाटेकरांनी गमन नावाच्या एका सिनेमातून एका छोट्याच्या भूमिकेतून करिअरची सुरूवात केली होती.त्यांना खरी ओळखी एन चंद्रा यांच्या अंकुश आणि विधू विनोद चोप्रा यांच्या परिंदा सिनेमामुळे मिळाली होती. 1991 मध्ये प्रदर्शित झालेला क्रांतीवीर हा सिनेमा सुपरहिट झाला होता. त्यानंतर त्यांनी ‘यशवंत’, ‘वजूद’, ‘युगपुरुष’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’ सारख्या अनेक भूमिकांमध्ये हिरोची भूमिका साकारली. ‘खामोशी’, ‘यशवंत’, ‘अब तक छप्पन’, ‘अपहरण’, ‘वेलकम’ आणि ‘राजनीति’ या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं आहे.

एक कलात्मक अभिनेता म्हणजे काय, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नाना, असंच अनेकांचं म्हणणं आहे. अशा या अभिनेत्याला त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये बऱ्याच मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. तर आजपर्यंत ज्यांनी प्रेक्षकांच्यामनावर अधिराज्या गाजवलं आहे, अशा अभिनेत्याबद्दल जाणून घेवू काही गोष्टी…

  • अभिनयासोबतच लेखन, चित्रपट निर्मिती या क्षेत्रांमध्येही ते सक्रिय आहेत.
  • वडिलांचा व्यवसाय बंद झाला तेव्हा नानांनी काम करण्यास सुरुवात केली. रोज ३५ रुपये आणि एक वेळचं जेवण असा त्यांच्या कमाचा मोबदला होता. ‘इंडिया टीव्ही न्यूज’च्या वृत्तानुसार नानांनी सुरुवातीच्या काळात झेब्रा क्रॉसिंग आणि चित्रपटांचे पोस्टर रंगवण्याचंही काम केलं.
  • नाना पाटेकर जसे उत्तम अभिनेते आहेत तसेच ते चांगले कूक आहेत. पाककलेमध्ये त्यांना विशेष आवड आहे. ते अजूनही त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मित्रमंडळींसाठी स्वत: जेवण बनवतात.
  • ‘प्रहार’ या चित्रपटासाठी नानांनी जवळपास तीन वर्षे सैन्यदलाचं प्रशिक्षण घेतलं होतं. ज्यासाठी त्यांना कॅप्टन या रँकने सन्मानित करण्यात आलं होतं.

विनोदाने हसवले प्रेक्षकांना
केवळ गंभीर भूमिका करणारा अभिनेता म्हणून नानांकडे बघितले जाऊ लागले होते. मात्र 2007 मध्ये रिलीज झालेल्या ‘वेलकम’ या सिनेमातून त्यांनी विनोदी भूमिकासुद्धा ते ताकदीने पेलू शकतात हे सिद्ध केले. नाना यांनी आपल्या तीन दशकांच्या करिअरमध्ये जवळजवळ 60 हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.

कार्टुन सीरिजला आवाज
नाना पाटेकर यांनी दर रविवारी दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘जंगल बूक’ या प्रसिद्ध कार्टुन सीरिजसाठी आपला आवाज दिला होता. या कार्टुनमधील शेरखान या व्हिलन कॅरेक्टरसाठी त्यांनी व्हॉईस ओव्हर दिला होता.