Independence Day Special: ऑगस्टमध्ये ओटीटीवर देशभक्तीचे रंग

0
266

थिटएटरमध्ये सिनेमा कधी प्रदर्शित होणार, याबाबत अद्याप तरी काहीच सांगता येत नाही. एकटय़ा अक्षयकुमारने ‘बेलबॉटम’ सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची घोषणा केलेली आहे. असे असले तरी ऑगस्ट महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसिरीज आणि सिनेमांचा पाऊस पडणार आहे. १५ ऑगस्ट’ आपला स्वातंत्र्य दिवस. हा दिवस साजरा करण्यासाठी याही वर्षी अनेकांनी खास तयारी केलीय. जसा जसा १५ ऑगस्टचा दिवस जवळ येतो तस तसं लोकांवर देशभक्तीचा रंग चढतो. सगळ्यात विशेष बाब म्हणजे यावर्षीचा स्वातंत्र्यदिन हा रविवारच्या दिवशी येतोय. याचाच अर्थ असा की यंदाचा विकेंड हा लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खूपच मजेदार असणार आहे. या सर्वांचा हॉलिडे मोड खूप आधीच सुरू होणार आहे.

शेरशाह

ज्या प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाचं चित्र पुन्हा एकदा अनुभवायचं असेल अशा प्रेक्षकांनी ‘शेरशाह’ हा चित्रपट पहायलाच हवा. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर ‘शेरशाह’ या चित्रपटासठी प्रेक्षक बऱ्याच दिवसापासून प्रतिक्षा करत होते. अखेर त्यांची ही प्रतिक्षा संपली असून आज हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झालाय. कारगिल शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन विष्णूवर्धन यांनी केलंय. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत अभिनेत्री कियारा अडवाणी देखील झळकतेय. शेरशाह’ सिनेमा 12 ऑगस्ट रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडियोवर बघता येईल.

भुज: द प्राइड ऑफ इंडिया (Bhuj: The Pride Of India)

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशभक्ती रंगात मिसळणारा आणखी एक चित्रपट ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ भेटीला येतोय. अजय देवगण या चित्रपटात स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 1971 साली पाकिस्तानने भारताच्या एअरबेसवर केलेल्या हल्ल्यावर आधारित हा चित्रपट आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधी भुजला 13 ऑगस्ट रिलीज होणार आहे. आपण हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर पाहू शकता.

बेलबॉटम:

या चित्रपटात पुन्हा एकदा अक्षय कुमार एका मिशनवर असुन आणि देशासाठी लढताना दिसत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये देशभक्ती आणि त्यासंबंधीतचे दृष्य दिसुन येत आहेत. अक्षय कुमारसोबतच या चित्रपटात वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी हे देखील दिसणार आहेत आणि रणजीत एम तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. असीम अरोरा आणि परवेज शेख लिखित ‘बेलबॉटम’ 19 ऑगस्ट 2021 रोजी रिलीज होणार आहे.