कंगनाची आई देखील शिवसेनेच्या विरोधासाठी मैदानात

0
204

कंगना रणौतच्या मुंबई कार्यालयावर बीएमसीने केलेल्या कारवाईवर सर्वत्र टीका होत आहे. शिवसेनेच्या धमकीनंतर कंगना व्हाय प्लस सुरक्षेसह मुंबईत आली. कारवाईनंतर, जेथे महापालिकाला न्यायालयाची पायरी चढावी लागली. तिथे राजकीय वर्तुळातही शिवसेनेची मोठ्या प्रमाणावर निंदा केली जात आहे. या सगळ्यात पहिल्यांदाच कंगनाच्या आई आशा रणौत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कंगनाचा त्यांना अभिमान असल्याचं म्हटलं. इतकंच नव्हे तर आशा रणौत म्हणाल्या की आम्ही सुरुवातीपासूनच कॉंग्रेसी होतो. पण अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमची साथ दिली. त्यांनी आमच्या मुलीला संरक्षण दिलं.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नंतर तिच्या आईने देखील शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेना भेकड अन् घाबरट आहे असं म्हणत कंगनाच्या आईने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी कंगनाच्या जीवाला धोका असल्याचा दावा देखील केला आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेवर टीका केली. त्या म्हणाल्या, ‘संपूर्ण भारतातील जनतेच्या सदिच्छा कंगनासोबत आहेत. मला माझ्या मुलीचा अभिमान आहे, ती नेहमीच सत्याच्या पाठीशी उभी असते. आशा राणौत यांनी म्हटलंय की, जर कंगना चुकीची असती तर संपूर्ण देश तिच्यासोबत नसता. ही कसली सरकार आहे. माझी मुलगी त्याच जनतेतील एक आहे, तिच्यासोबत एवढा अन्याय का? याला सरकार म्हणतात का? ही बाळासाहेबांची शिवसेना नाहीच आहे. ज्या शिवसेनेला आम्ही लहानपणापासून बघत आलोय.

संपूर्ण भारत माझ्या मुलीसोबत असताना मुंबईत असा अन्याय का? ही बाळासाहेब ठाकरे यांची सेना नसून भेकड, भ्याड आणि घाबरट शिवसेना आहे. आम्ही त्यांच्यासारखे वंशवादी नाही. कंगनाने गेली १५ वर्षे कष्टानं पैसे कमावले आहेत. हे कसलं सरकार आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार. माझ्या मुलाली सहकार्य केलं नसतं तर माझ्या मुलीचं समर्थन कोणी केलं असतं? असं कंगनाची आई म्हणाली.