आवाज कुणाचा… !!! पुरुषोत्तम करंडक स्पर्धा यंदा पहिल्यांदाच वर्षात दुसऱ्यांदा

0
281

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा महाविद्यालये नियमितपणे सुरू झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन नाट्यकर्मींची पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठीची तयारी सुरू झाली असून, यंदा पहिल्यांदाच एका वर्षात दुसऱ्यांदा पुरुषोत्तम करंडक स्पर्धा रंगणार आहे. तसेच दोन वर्षांच्या खंडानंतर राज्यातील अन्य केंद्रांवरही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. पुण्यातील सर्वात मानाची आणि मोठी मानली जाणारी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा होणार आहे. त्यामुळे महाविद्यालयातील नाट्य मंडळातील विद्यार्थी जोशात कामाला लागल्याचं चित्र आहे.

यंदा प्रथमच पुरुषोत्तम करंडक स्पर्धा एका वर्षात दुसऱ्यांदा होणार आहे. दोन वर्षांनी राज्यातील इतर केंद्रांवरही ही स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्रीय कलोपासक पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे आयोजन करते.

स्पर्धेची प्राथमिक फेरी दरवर्षी ऑगस्टमध्ये आणि अंतिम फेरी सप्टेंबरमध्ये होते. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षणतज्ज्ञांसह स्पर्धेचे वेळापत्रकही बदलले. गेल्या वर्षी ही स्पर्धा जानेवारीत झाली होती. सात महिन्यांनंतर ही स्पर्धा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये होणार आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी 14 ते 29 ऑगस्ट आणि अंतिम फेरी 17 आणि 18 सप्टेंबर रोजी होईल.

विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा अंतिम टप्प्यात आहेत. महाविद्यालयेही नियमित सुरू झाली आहेत. त्यामुळे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची चर्चा महाविद्यालयीन नाट्यकर्मींमध्ये रंगू लागली आहे. आता टप्प्याटप्प्याने सर्वच गोष्टी पूर्वपदावर येत असताना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे वेळापत्रकही पूर्वपदावर आले आहे. मात्र पन्नास वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या या स्पर्धेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच एका वर्षात दुसऱ्यांदा स्पर्धा होत आहे.

गेल्या वर्षीची स्पर्धा करोनाच्या प्रादुर्भावामुळे उशिराने, जानेवारीमध्ये झाली. तीही केवळ पुणे केंद्रावर झाली. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच एका वर्षात दोन वेळा स्पर्धा होत आहे. आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, महाविद्यालये नियमित सुरू झाल्याने स्पर्धा करोनापूर्व काळातील वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात आली आहे. तसेच राज्यभरातील अन्य केंद्रांवरही नेहमीप्रमाणे स्पर्धा पार पडेल.

या स्पर्धेने आतापर्यंत अनेक कलाकार मराठी-हिन्दी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यात सुबोध भावे, तेजस बर्वे, प्रियांका बर्वे, आलोक राजवाडे, सारंग साठे, पर्ण पेठे, गिरीजा ओक यांच्यासारख्या हरहून्नरी कलाकारांचा यात समावेश आहे. येत्या काळात देखील नवे प्रयोग करत महाविद्यालयीन विद्यार्थी मराठी-हिन्दी चित्रपटसृष्टीत या स्पर्धेमार्फत प्रवेश घेतील, अशी अपेक्षा आहे.