रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ च्या पोस्टरवर झळकतायत मराठी कलाकार;

0
210
  • दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या बहुप्रतिक्षित ‘सर्कस’ चित्रपटाचं पोस्टर आता प्रदर्शित झालं आहे. 

चित्रपट निर्माता रोहित शेट्टीचा आगामी सर्कस हा कॉमेडी चित्रपट 23 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट विल्यम शेक्सपियरच्या (William Shakespeare) द कॉमेडी ऑफ एरर्स ( The Comedy of Errors ) या क्लासिक नाटकावर आधारित आहे, जो एकसारख्या जन्मावेळी चुकून वेगळे झालेल्या जुळ्या मुलांच्या दोन व्यक्तींभोवती फिरतो. यात अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिका साकारत आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टीचे चित्रपट म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाचा डबल डोस असतो. अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स सारं काही एकत्र त्याच्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळतं. त्याचा शेवटचा ‘सुर्यवंशी’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता रोहितने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या बिग बजेट चित्रपटामध्ये हिंदीसह मराठी अभिनेत्यांच्या नावाचीही वर्णी लागली आहे. रोहितचा हा नवा प्रोजेक्ट म्हणजे मल्टिस्टारर चित्रपट असणार आहे.

रोहितच्या या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. यात रणवीरचा डबल रोल आहे. तर अभिनेता वरुण शर्मा याचाही चित्रपटात डबल रोल आहे. त्यांच्यासोबत अभिनेत्री पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहे. रोहितच्या इतर चित्रपटांप्रमाणे याही चित्रपटात मराठी कलाकार आहेत. पोस्टरमध्ये बारकाईने पाहिल्यावर मधोमध पाय वर केलेला मराठमोळा सिद्धार्थ जाधव आपल्याला दिसतो. तर त्याच्या बाजूला बसून मिशीला पीळ देणारा अभिनेता सौरभ गोखले देखील दिसतो. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या पोस्टरला चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. चित्रपट येत्या २३ डिसेंबरला म्हणजे ऐन ख्रिसमसच्या मोक्यावर बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.

रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘सर्कस’ (Cirkus) या त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. “प्रेक्षकांना पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये आणण्याची हिच ती वेळ आहे. ‘सर्कस’ चित्रपट म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी ख्रिसमस गिफ्ट आहे. कारण या सर्कसमध्ये खूप गोलमाल आहे.” असं रोहितने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना म्हटलं आहे. रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटामध्ये देखील मनोरंजनाचा डबल डोस प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.