Oscar 2021: भारताचा ‘जलीकट्टू’ ऑस्कर बाहेर; बिट्टू’ची घोडदौड मात्र कायम

0
289

ऑस्कर (Oscar 2021) हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. या पुरस्कार स्पर्धेसाठी देशभरातील 27 शॉर्ट फिल्मची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ‘बिट्टू’ ही फिल्म अधिकृतरित्या ऑस्करसाठी भारताकडून पाठवण्यात आली आहे. चित्रपट समीक्षक व प्रेक्षकांकडून दाद मिळवणारी ‘बिट्टू’ ही शॉर्ट फिल्म (Bittu short film) ऑस्करच्या शर्यतीत उतरली आहे.

चित्रपट समिक्षक व प्रेक्षकांकडून दाद मिळवणारा ‘जलिकट्टू’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरीदेखील ‘बिट्टू’ या लघुपटाने बाजी मारली आहे. या लुघपटाने पहिली फेरी पार केली आहे. त्यामुळे आता तो लाईव्ह अ‍ॅक्शन फिचर फिल्म या विभागात नामांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ऑस्करसाठी भारताकडून ‘बिट्टू’ हा लघुपट पाठवण्यात आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे.

येत्या 15 मार्च रोजी अंतिम नामांकन जाहीर करण्यात येणार आहे. यावर्षीच्या 93 व्या ऑस्कर सोहळ्यासाठी जगभरातून 93 चित्रपटांना नामांकन मिळाले होते. त्यामध्ये भारतातील जलीकट्टू या मल्याळम चित्रपटाचा समावेश होता. तसेच करिश्मा दुबे दिग्दर्शित शॉर्टफिल्म ‘बिट्टू’ चाही यात समावेश होता.

‘बिट्टू’ ऑस्करच्या शर्यतीत
करिश्मा देव दुबे यांनी दिग्दर्शित केलेला बिट्टू शॉर्टफिल्म ऑस्करच्या शर्यतीत अजूनही आहे. बिट्टू ही शॉर्टफिल्म दोन शाळकरी मित्रांच्या जीवनावर आधारीत आहे. ही फिल्म आतापर्यंत जगातील 18 फिल्म फेस्टिवल्समध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. तर दिग्दर्शक लिजो जोस पेलीसरी यांची मल्याळम फिल्म जलीकट्टू ही भारतातून ऑस्करसाठी पाठवलेली एन्ट्री होती.

करिष्मा देव दुबे यांनी दिग्दर्शित केलेला ‘बिट्टू’ हा लघुपट पुढच्या फेरीत पोहोचला आहे. ‘दा यी’, ‘फीलिंग थ्रू’, ‘दी ह्य़ूमन व्हॉइस’, ‘दी किक्सलेड कॉयर’, ‘दी लेटर रूम’, ‘दी प्रेझेंट’, ‘टू डिस्टंट स्ट्रेंजर्स’, ‘दी व्हॅन’ व ‘व्हाइट आय’ हे लघु चित्रपट पहिल्या दहामध्ये आहेत. यापूर्वी आशुतोष गोवारीकर यांचा ‘लगान’ हा चित्रपट २००१ मध्ये अंतिम फेरीत जाऊन बाद झाला होता.

करिष्मा दुबे हिने या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन केलं आहे या फिल्ममध्ये आरोही पटेल, मौलिक नायक, मेहुल सोलंकी, हेमांग शाह यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांनी काम केलं आहे. जबरदस्त पटकथा आणि अभिनय यामुळे शॉर्ट फिल्म स्पर्धांमध्ये ही फिल्म सुपरहिट ठरली होती.

फॉरेन लॅंग्वेज कॅटेगरीत अजून पुरस्कार नाही
फॉरेन लॅंग्वेज कॅटेगरीत अद्याप कोणत्याही भारतीय चित्रपटाने ऑस्कर पटकावला नाही. आतापर्यंत गली बॉय, व्हिलेज रॉकस्टार्स, न्यूटन, विसारानई, आणि कोर्ट हा मराठी चित्रपट फॉरेन लॅंग्वेज कॅटेगरीत ऑस्करच्या शर्यतीत होते. पण या चित्रपटांना ऑस्कर मिळवण्यात अपयश आलं होतं.