सुशांत सिंह राजपूत प्रकरण CBI कडे सोपविण्यासाठी केंद्र सरकारची सहमती

0
351

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण (Sushant Singh Rajput Case) सीबीआय (CBI) चौकशीसाठी बिहार सरकारने दिलेल्या शिफारशीला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान ही माहिती देण्यात आली. केंद्राने बिहार सरकारची सीबीआय चौकशीच्या शिफारसीची मागणी मंजूर केली आहे. सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारच्या वकिलांनी ही माहिती दिली. आता या केसची सीबीआय चौकशी होणार आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशी केली जावी ही मागणी सोशल मीडियावर लावून धरण्यात आली होती. तसेच सुशांतच्या वडिलांनीही ही मागणी बिहार सरकारकडे केली होती.

सुशांतसिंह राजपूत या बॉलिवूडच्या उमद्या कलावंताने 14 जून दिवशी मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र रिया चक्रवर्ती त्याच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा दावा सिंह कुटुंबाने केला असून पाटना मध्ये त्यांनी FIR नोंदावला आहे. त्यानंतर बिहार पोलिस देखील आत्महत्येचं गुढ उकलण्यासाठी सक्रिय झाले आहे.

केंद्र सरकारचे वकिल एस. जी. तुषार मेहता यांनी सुप्रिम कोर्टात माहिती दिली की, या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी. ही बिहार सरकारची मागणी केंद्राने मंजूर केली आहे. रिया चक्रवर्ती हिच्या वतीने वकिल श्याम दीवान यांनी बाजू मांडली असून त्यांनी सांगितले की, कोर्टाने रियाच्या याचिकेकडेही लक्ष द्यावे. तसेच सुशांतसंबंधीच्या सर्व याचिकांवरील सुनावणीवर स्थगिती देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

सुशांतच्या चाहत्यांसोबतच त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन आपला आनंद व्यक्त केला आहे. सुशांतच्या प्रकरणाचा तपास CBI कडे देण्यात आल्यानंतर अंकिता लोखंड हिने ‘ज्या क्षणाची आपण सर्व आतुरतेने वाट पाहात होतो तो क्षण अखेर आला’ असे म्हणत इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे.

https://www.instagram.com/lokhandeankita/?utm_source=ig_embed