मराठीत पहिला झोंबिवर सिनेमा: ‘झोंबिवली’चा हटके मोशन पोस्टर प्रदर्शित

0
893

लाईट्स, कॅमेरा, अ‍ॅक्शन’ म्हणण्यासाठी राज्य सरकारने मनोरंजनसृष्टीला ग्रीन सिग्नल दिला आहे. पण अर्थात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या नियमांच्या चौकटीत राहूनच चित्रीकरणाला परवानवगी मिळाली आहे. मराठी प्रेक्षकांसाठी एक आगळा वेगळा अनुभव घेऊन येत आहे ‘झोंबिवली’ हा सिनेमा. हा मराठीतील पहिला हॉरर कॉमेडी सिनेमा असेल. ज्याला झॉम-कॉम असही म्हणता येईल कारण यात झोंबि हा प्रकारही पाहायला मिळेल. पुढील वर्षी 2021मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.

हॉरर-कॉमेडी ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते आणि त्या हटके पोस्टरमुळे सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली. पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेले झोंबी आणि त्याविषयीची कथा याची उत्सुकता देखील वाढली होती. आता प्रेक्षकांना झोंबीची छोटीशी झलक पाहायला मिळणार आहे. कारण ‘झोंबिवली’ चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. आतापर्यंत प्रेक्षकांनी हिंदी आणि इंग्रजी सिनेमात झोंबीज पाहिले आहेत, पण ‘झोंबिवली’च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठीमध्ये पण आता झोंबीज् पाहायला मिळणार आहेत. सारेगम प्रस्तुत आणि Yoodlee Films निर्मित ‘झोंबिवली’ या सिनेमाचा मुहूर्त नुकताच मुंबई येथे पार पडला आणि या सिनेमातील काही सीन्सचे शूटिंग लवकरच लातूर येथे होणार आहे. आता प्रेक्षकांना झॉम्बीची छोटीशी झलक पाहायला मिळणार आहे कारण ‘झोंबिवली’ चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

ब-याच कालावधीनंतर मराठी सिनेमात हॉरर-कॉमेडी पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत आपण बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये झोंबिवर आधारित सिनेमे पाहिले आहेत…पण मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच झोंबिवर आधारित सिनेमा बनतोय. या सिनेमाचे शिर्षक इंटरेस्टिंग आहेत आणि डोंबिवलीमधील झोंबिज असे कनेक्शन असल्यामुळे सिनेमाचे नाव ‘झोंबिवली’ असे आहे. युथ स्टार्स अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. निर्मात्यांच्या मते ‘झोंबिवली’ हा सिनेमा तरुण पिढीला लक्षात ठेवून बनवला आहे.