पावरी हो रही है” नक्की आहे तरी काय? का होतेय ते एवढे ट्रेंड?

0
328

सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट किंवा व्हिडीओ फेमस होईल सांगता येत नाही. सध्या इंटरनेटवर वायरल होत असलेला ‘Pawri Ho Rahi Hai’ हा व्हीडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल. त्याबद्दलचे अनेक दुसरे व्हीडिओ MEMS, तुम्ही पाहिले आणि अगदी शेअर देखील केले जात आहेत. या व्हीडिओ बद्दलचे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील नाही का. नक्की हे “पावरी हो रही है हे” आहे तरी काय आणि कोठून हा व्हिडीओ वायरल झाला नाही का.

ही मुलगी पाकिस्तानी कॉन्टेंट क्रिएटरअसून तिचे नाव Dananeer आहे, तिने 6 फेब्रूवारीला हा व्हीडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता, त्याला 15 लाखाहून अधिक VIEWS मिळाले आहेत. पाकिस्तानची दनानीर मुबीर नावाच्या तरुणीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत ती आपल्या मैत्रीणींसोबत पार्टी करत होती. या व्हिडीओत ती ‘ये हमारी कार है, ये हम है, और ये हमारी पावरी हो रही है’, असं म्हणताना दिसत आहे. पार्टीचा उल्लेख पावरी असा केल्याने सोशल मीडियावर तिची प्रचंड खिल्ली उडवली जात आहे. भारतात ‘रसोडे मे कौन था’ असं रॅप साँग तयार करणारा म्युजिक कम्पोसर यशराज मुखाते याने तर मुलीच्या डॉयलॉगवर रॅप साँगच तयार केलं. Dananeer चा पार्टीला पावरी बोलण्याचा अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. फक्त नेटकऱ्यांनी नाही तर नेटफ्लिक्स पासून डॉमिनॉज, पीआयबी फॅक्टचेक, झोमॅटोपर्यंत अनेकांनी हे मीम्स शेअर केले आहेत.

एवढंचं काय तर रसोड़े में कौन था’, ‘बिगिनी शूट’ और ‘त्वाड्डा कुत्ता टॉमी, साड्डा कुत्ता, कुत्ता’ पर जबरदस्त मैशअप केलेल्या Yashraj Mukhate नी ‘Pawri Ho Rahi Hai’ वर सुद्धा एक गाणं तयार केलं आहे. त्यामुळे या व्हीडिओची Popularity आणखीणंचं वाढली आहे.

 

सोशल मीडियावर ज्या चुकीच्या बातम्या पसरतात त्याबाबत जागरुकता निर्माण करणाऱ्या PIB फॅक्ट चेकने आपल्या ट्विटर हॅण्डलवरही ‘पावरी हो रही है’ या वाक्याचा वापर केला आहे. “तुमचं तशाप्रकारे पावरी होणार नाही. मात्र तुम्ही खोट्या बातम्यांचा पर्दाफाश करण्यासाठी आमच्यासोबत जुडू शकता”, असं पीआयबी फॅक्ट चेकने म्हटलं आहे. पीआयबी फॅक्ट चेकचा हा अंदाज अनेकांना आवडला आहे.