World Saree Day: जागतिक साडी दिवस स्पेशल

0
1163

लग्न-मुंजीचा सोहळा, घरगुती सणसमारंभ असो किंवा कॉर्पोरेट मिटींग असो साडी हा असा पोषाख आहे जो कुठल्याही प्रसंगी परिधान केला तरी चालतो. म्हणूनच वेस्टर्न कल्चरचा कितीही प्रभाव पडला तरी स्त्रियांच्या मनातील आणि कपाटातील आपले स्थान साडीने अजूनही कायम ठेवले आहे. शरीरयष्टी कशीही असली, रंगरुप कसेही असेल तरी प्रत्येक स्त्रीला साडी शोभूनच दिसते. असंख्य प्रकार, नेसायच्या पद्धती, अगणित रंगसंगती असलेले आणि कोणत्याही स्त्रीला शोभून दिसणारे साडी हे जगातील एकमेव वस्त्र असेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. २१ डिसेंबर हा दिवस जागतिक साडी दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय पेहरावांपैकी सर्वात सुंदर पेहराव. तसा हा पेहराव बहुतांशी भारतातच वापरात आहे, तरी देखील आपली प्रत्येक गोष्ट जागतिक असते.

साडी हा वैश्विक व सनसंस्कृतीतला सगळ्यात जुना आणि अजूनही वापरत राहिलेला वस्त्रप्रकार आहे! साडी हे नाव संस्कृत ‘शाटी’ म्हणजेच कापडाची पट्टी यावरून आले आहे. त्याचेच प्राकृत रूप साडी. जुन्या जातक कथांमध्ये स्त्रीच्या वस्त्रांसंबंधी सट्टिका या शब्दाचा उल्लेख येऊन गेलेला आढळतो.

जीन्स-टॉपमध्ये comfort वाटत असला किंवा पंजाबी ड्रेसेसच्या वापरामध्ये सहजता दिसत असली तरी “साडी” या प्रकाराला जेवढी मोहकता आहे तेवढी इतर कुठल्याही कपड्यात नाही.सुंदर दिसण्यासाठी साडी महागच असावी लागते असं अजिबातच नाहीये.साडीचा सुरेख रंग…….टाचंही दिसणार नाही इतपत योग्यप्रकारे जमिनीपर्यंत नेसलेली साडी…आणि लांबरुंद पदर एवढं असेल तर साडीसारखं दुसरं सौंदर्य नाही.

बरं,साडी नेसायला फार काही विशेष तुमच्याकडे असावं लागत नाही…. गरीब-श्रीमंत,जाड-बारीक,उंच-बुटके,तरुण-वयस्कर, शिक्षित-अडाणी कसेही असाल तरी साडी तुम्हांला एक आत्मविश्वास देऊन जाते. हा..फक्त आता ती नेसलेली साडी सावरायचा आत्मविश्वास आपल्यात असला पाहिजे हे नक्की!! पाचवारी पाठोपाठच आपल्या महाराष्ट्रात प्रचलित असलेला प्रकार म्हणजे नऊवारी साडी.आजकाल नऊवारी साड्या नेसणाऱ्या आजींची पिढी गायब झालेली दिसत असली तरी सणसमारंभात,लग्नामुंजीत नऊवारी साड्यांना आपल्याकडे अजूनही प्राधान्यच आहे.

तरं अशी ही मानपानाची… लग्नानंतरची… भेट दिलेली… पहिल्या पगारातून घेतलेली… काही हजारांची…. सेलमध्ये मिळणारी… नऊवारी… सहावारी… मराठी… पंजाबी… दाक्षिणात्य… कांजीवरम… पैठणी… येवल्याची… बंगाली… तिला आवडलेली… काठ पदराची… प्लेन पदराची… अशा बऱ्याच विशेषणांनी ओळखी जाणारी साडी. सर्व महिलांना आजच्या या खास दिवसाच्या म्हणजेच जागितक साडी दिनाच्या शुभेच्छा…!!

साडी नेसल्यावर दिसतेस तू एकदम छान
आजची नारी समाजासाठी आन बाण शान…!!”