#गो कोरोना गो: सर्वांची हवी आहे साथ, कोरोनावर करूया मात

0
1003

अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्रासह देशातील करोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात जनता संचारबंदीला सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे. करोना विषाणूचे देशावर ओढावलेल्या संकटावर मात करण्यासाठी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केले होते.

खरं तर ह्या कोरोनामुळे मात्र एक नक्की चांगले झालेय ते म्हणजे आपण सर्व भारतीय आणि माणुसकी म्हणून एकत्र आलो आहे. सध्या तरी ह्यामध्ये जात पात हा भेदभाव दिसून आला नाही. आता ह्याच कोरोनाला आपण सर्वांनी मिळून बाय बाय करायचे आहे, जशा सूचना आपल्याला मिळत आहे त्यांचे पालन करून. काही दिवस घरी बसून आणि स्वच्छतेची काळजी घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

अजून एक म्हणजे आपल्यासाठी जे लोक रस्त्यावर उतरून काम करत आहे त्याबद्दल ही अभिमान वाटतोय. सर्व डॉक्टर्स, नर्सेस तसेच पोलीस ह्यांना आपण सर्वानी मिळून एक सलाम करुन त्यांना हवी तशी मोलाची साथ देणे गरजेचे आहे. एक ठिकाणी आपण सर्वजण घरी बसलो आहे, तर एक ठिकाणी सर्व डॉक्टर दिवसाची रात्र करून कोरोनाग्रस्त पेशंटची सेवा करत आहे तसेच एअरपोर्टवर काही डॉक्टर्स बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात व्यस्त आहे ते फक्त ह्या देशातील नागरिकांना कोरोनाचा त्रास होऊ नये म्हणून. पोलिसही नागरिकांनी बाहेर पडू नये तसेच सर्व काही सुरळीत व्हावे म्हणून आपल्या सेवेसाठी काम करत आहे.

आज वेळ आली आहे ते म्हणजे सर्व तरुणाईने कोरोनाबद्दल जनजागृती करून नागरिकांपर्यत अवश्य ती माहिती पोहचविले पाहिजे. सोशल मीडियाचा गैरपवर करण्यापेक्षा योग्य वापर करून ग्रामीणभागांपर्यतही योग्य ती माहिती देण्याचे काम केले पाहिजे. घरी बसूनही हे सर्व काम आपण करू शकतो नाही का. कोरोनाला रोखण्यासाठी अवश्य ती मदत आपण एकत्र येऊन करू शकतो.

तर चला एक प्रतिज्ञा करूया

मी एक भारतीय माणुसकी या नात्याने घरी बसून तसेच जनजागृती करून कोरोनाला कायमचे गुडबाय करण्यासाठी काम करेल. योग्य ती स्वच्छतेची काळजी घेईल.