लॉकडाऊन : कोणत्या झोनमध्ये काय खुलं ? काय बंद ?

0
444

(ऑरेंज आणि ग्रीन झोनला काही मुभा)

भारतात लॉकडाऊन आणखी २ आठवड्यांसाठी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. देशभरात १७ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु राहणार आहे. गृहमंत्रालयानं पत्रक प्रसिद्ध करुन लॉकडाऊनच्या काळातील मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या आहेत.

नवीन नियमांप्रमाणे काही मर्यादित गोष्टी देशभरामध्ये बंदच राहणार असल्याचं गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमध्ये सरसकटपणे काही सेवा बंदच ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही गोष्टींना सुट देण्यात आली आहे.

गृह मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन दरम्यान हवाई उड्डाण, रेल्वे सेवा आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याची परवानगी नाही. इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांना केवळ सरकारकडून व्यवस्था करण्यात आलेल्या बसची आणि विशेष रेल्वेचीच मदत घ्यावी लागणार आहे. लॉकडाऊन दरम्यान अडकलेल्या मजुरांना घेऊन जाण्यासाठी होणारा खर्च रेल्वे राज्य सरकारकडून वसूल करणार आहे. सोबतच या दरम्यान शाळा, महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थांचं संचालनही बंद असेल. याशिवाय रेस्टॉरंट, हॉटेल, पूजा स्थळ आणि लोकांनी एकत्र जमण्याला बंदी सुरूच राहील.

१. रेड झोन

सायकल रिक्षा, ऑटो रिक्षा, टॅक्सीवर बंदीदोन जिल्ह्यांमध्ये होणारी बस वाहतूक बंद ,

केशकर्तनालय दुकाने, स्पा बंद

रेड झोनमध्ये परवानगी घेऊन चारचाकीमध्ये दोन व्यक्तींना प्रवासाची मुभा असेल.अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळता सर्व दुकाने रेड झोनमध्ये बंद राहतील. मात्र कॉलिनीमध्ये असणारी दुकाने उघडी ठेवणाची परवानगी आहे.

२ ऑरेंज झोन
वाहतूक व्यवस्था बंद असेल. फक्त कॅबची सुविधा सुरू असेल. एका गाडीत दोन व्यक्तीला प्रवास करता येईल. १ चालक आणि २ प्रवासी. ऑरेंज झोनलाही रेड झोन प्रमाणेच नियम असतील फक्त तेथे टॅक्सी आणि रिक्षा सेवेला मुभा देण्यात आली आहे.

३ ग्रीन झोन
बसेस चालतील. परंतु बसेसची क्षमता ५० टक्के पेक्षा जास्त नसावी. डेपोमध्ये पण ५० टक्केच कर्मचारी असावेत. सलून खुले राहतील. चित्रपटगृह, मॉल, स्पोर्टस कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी नाही. खबरदारी घेत उद्योग सुरू राहतील.

  • खाजगी कंपन्यांत ३३ टक्के कर्मचारी असावेत.
  • शहरी भागात बांधकामासाठी परवानगी. परंतु तिथेच कामगार उपलब्ध असावेत. बाहेरून कामगार आणता येणार नाही.

तिन्ही झोनमध्ये पुढील गोष्टी बंद राहणार

  • रेल्वे, मेट्रो, विमान सेवा बंद राहणार
  • चित्रपटगृह, शॉपिंग मॉल, जिम, स्वीमिंग पूल, पार्क बंद राहणार
  • सामाजिक, राजकीय कार्यक्रम, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक स्थळ बंद राहणार