- 31 तारखेला महाराष्ट्र सरकारकडून लॉकडाउन 5 बाबत गाइडलाइन जारी केले जाऊ शकतात
- संपूर्ण देशात रात्री 9 ते पहाटे 5 या काळात नाईट कर्फ्यू लागू असेल
- सिनेमा हॉल, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार इत्यादी अद्याप बंद राहतील
देशात लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन 5 बाबतच्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन तीन टप्प्यांमध्ये असणार आहे. ग्रीन, रेड आणि ऑरेंज झोन रद्द करुन त्याऐवजी कंटेन्मेंट हा एकच झोन असणार आहे. लॉकडाऊन 5.0चं नाव अनलॉक-1 असं असणार आहे. लोकांना मास्क लावणं आवश्यक असणार आहे.
देश आता अनलॉक होणार आहे. सरकारने यासाठी शनिवारी नवी गाइडलाइन जारी केली. याअंतर्गत 8 जूननंतर अटी आणि शर्तींसह हॉटेल, रेस्तराँ, शॉपिंग मॉल्स आणि धार्मिक स्थळे सुरू होणार आहेत. देशभरात फक्त कंटेनमेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. संपूर्ण देशबरात रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत कर्फ्यू राहील. शाळा-महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय जुलैमध्येच होणार आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि सामान्य लोकांसाठी सिनेमा हॉलसारखी ठिकाणं सुरू करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. दरम्यान महाराष्ट्र सरकार सध्या केंद्राच्या नवीन गाइडलाइनचा अभ्यास करत आहे. त्यानुसार, 31 तारखेला राज्य सरकारकडून गाइडलाइन जारी केले जाऊ शकतात.
दोन राज्यांमध्ये तसेच राज्यांतर्गत प्रवासासाठी स्वतंत्र परवानगी घेण्याची तसेच ई-परमिट बाळगण्याची आवश्यकता नाही. पण राज्य सरकार अटी घालू शकते.
“राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक आरोग्य आणि परिस्थितीच्या आधारावर वाहतुकीवर काही निर्बंध लागू करायचे असतील तर त्यांना त्या संदर्भात आगाऊ माहिती जाहीर करावी लागेल तसेच सर्व प्रक्रियांचे पालन करावे लागेल” असे आदेशात म्हटले आहे.
पहिल्या टप्प्यात काय उघडणार
– आठ जूनपासून धार्मिक, प्रार्थना स्थळे खुली होणार.
– हॉटेल, रेस्टॉरंट सेवा सुरु होणार.
– शॉपिंग मॉल उघडणार.
दुसऱ्या टप्प्यात काय उघडणार
– शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर चर्चा करुन उघडण्यात येतील. पालकांसह सर्व संबंधितांचे याबद्दल मत जाणून घेण्यात येईल. जुलै महिन्यात या संदर्भात निर्णय होईल.
तिसऱ्या टप्प्यात काय उघडणार
सर्व परिस्थितीचे आकलन करुन, व्यवस्थित आढावा घेऊन रेल्वे, हवाई प्रवास कधी सुरु करायचा त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.
– आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो रेल्वे,
– सिनेमा हॉल, जीम, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, थिएटर, बार, हॉल,
– क्रीडा, मनोरंजन, धार्मिक कार्यक्रम आणि अन्य कार्यक्रमांना परवानगी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.