जर तुम्ही बँकेची महत्त्वाची कामे करायची असल्यात थोडी घाई करा, कारण बँक बंद व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. शनिवार, रविवार आणि होळी या सणामुळे गेली तीन दिवस बँका बंद होत्या. मात्र तीन दिवसांनंतर बँका आज सुरु झाल्या आहेत. मात्र आज एकच दिवस बँक सुरु राहणार आहे. त्यामुळे बँकांसंदर्भात तुमचे काही महत्त्वाचे काम असेल तर आजचं करा. कारण उद्यापासून तीन दिवस बँका बंद असणार आहेत.
उद्या 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपत असल्याने बँकांमध्ये दैनंदिन कामकाज होणार नाही. तर, 1 एप्रिल रोजी वार्षिक खाती बंद करण्यासाठी बँका बंद असतील. नंतर २ एप्रिल रोजी गुड फ्रायडेची सुट्टी असल्याने बँकांचं कामकाज दोन तारखेलाही बंद असेल.
४ एप्रिल या कालावधीचे संपूर्ण वेळापत्रक पहा
३१ मार्च २०२१ – आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस
१ एप्रिल २०२१ – बँकांचे लेखा
२ एप्रिल २०२१ – गुड फ्राइडे
३ एप्रिल २०२१ – सर्व बँका खुल्या राहतील
४ एप्रिल २०२१ – रविवार
त्यानंतर तीन तारखेला पहिला शनिवार असल्याने बँकांचं कामकाज सुरू असेल, पण सुट्ट्यांनंतर बँका सुरू होणार असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. नंतर, ४ तारखेला पुन्हा रविवारी बँका बंद असतील. त्यामुळे बँकेशी संबंधित कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पाच एप्रिलची वाट बघावी लागेल. आज (दि.३०) बँकांमध्ये कामकाज सुरु असल्याने आजच महत्त्वाची कामं उरकून घेणं फायदेशीर ठरेल.