चिनुक आणि अपाचे हॅलीकॅप्टर नेमके कसं आहेत?

0
336

अपाचे हॅलीकॅप्टर

भारतीय हवाई दलात आता जगातील सर्वात शक्तिशाली अपाचे हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत. त्यामुळे आता भारत हायटेक युद्धासाठी सज्ज झाल्याचं चित्रं आहे. चीन आणि पाकिस्तानसारखे शेजारी देश असताना भारताची हवाई सुरक्षा आणि प्रतिकार क्षमता आणखी वाढली आहे. भारतीय वायू दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या नव्या अस्त्राचं नाव अपाचे AH-64 हेलिकॉप्टर्स आहे. हे हेलिकॉप्टर फक्त आणि फक्त युद्धात वापरले जातात. शत्रूला मृत्यूच्या दाढेत ढकलण्यासाठी आठ अपाचे हेलिकॉप्टर्स भारतीय वायू दलाच्या ताफ्यात सामील झाले आहेत.

अपाचे AH-64 चा इतिहास

  • 1975 मध्ये अमेरिकेने या हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली
  • 1984 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेच्या सैन्यादलात या हेलिकॉप्टरला सामिल करण्यात आलं.
  • 1986 मध्ये हे हेलिकॉप्टर्स पहिल्यांदा युद्धभूमीवर वापरण्यात आलं
  • अमेरिकेशिवाय नेदरलँड्स ,इजिप्त ,इस्रायलच्या ताफ्यातही अपाचे हेलिकॉप्टर्स आहेत.
  • इस्त्रायलने लेबनान आणि गाझा पट्ट्यात आपल्या सैनिकी कारवाईसाठी याच हेलिकॉप्टरचा वापर केलाय

अपाचे AH-64 हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये

  • अपाचे AH-64 मल्टी रोल कॉम्बॅट हेलिकॉप्टर असून युद्धात हल्ल्यासाठी वापरले जाणारे एकमेव हेलिकॉप्टर आहे.
  • विशेष बनावटीमुळे शत्रूच्या रडारमध्ये सहज दिसत नसल्याने सुरक्षा भेदण्यात सक्षम आहे.
  • 293 कि.मी. प्रतितास वेगाने उड्डाण करण्याची क्षमता
  • क्षेपणास्त्रांनी परिपूर्ण असे हे अपाचे हेलिकॉप्टर्स आहेत
  • दिवसा किंवा रात्री कोणत्याही वातावरणात कारवाई करण्याची ताकद यामध्ये आहे.

चिनुक हेलिकॉप्टर

बोइंग सीएच-४७ चिनुक हे अमेरिकी सैन्यदलांच्या ताफ्यातील अवजड मालवाहू हेलिकॉप्टर आहे. मागे आणि पुढील अशा दोन्ही बाजूंना असलेले आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरणारे त्याचे दोन मोठे रोटर (पंखे) हे त्याचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे ते सहज ओळखता येते.

टॅण्डम रोटर हे बोइंग सीएच-४७ चिनुक हेलिकॉप्टरचे मुख्य वैशिष्टय़. त्यावर दोन टोकांना दोन मोठे पंखे आहेत. ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरतात. त्यामुळे एका रोटरने तयार होणारा टॉर्क दुसऱ्या रोटरने नाहीसा होतो. म्हणजेच पंख एका दिशेने फिरू लागला की हेलिकॉप्टर दुसऱ्या दिशेने गोलाकार फिरू लागते. हा परिणाम (टॉर्क) नाहीसा करण्यासाठी सामान्य हेलिकॉप्टरला शेपटाकडे लहान, उभा रोटर असतो. त्याची चिनुकमध्ये गरज नाही. त्यामुळे चिनुकला उड्डाणादरम्यान असाधारण स्थैर्य लाभते. परिणामी खराब हवामानात जिथे अन्य हेलिकॉप्टर वापरता येत नाहीत तिथे चिनुक वापरता येते.

चिनुक सी एच ४७ हे हेलिकॉप्टर चं नाव हे अमेरिकेतल्या वॉशिंग्टन इथे आधी राहणाऱ्या चिनुक लोकांच्या जमातीवरून दिलं गेलं आहे. ह्याची निर्मिती बोईंग कंपनी ने केली आहे. आजवर १२०० पेक्षा जास्त चिनुक ची निर्मिती झालेली आहे. चिनुक हे वेगवेगळी पाती आणि रोटर असणारं हेलिकॉप्टर असून दोन्ही पाती शक्तिशाली अश्या टी ५५ – जीए- ७१४ए इंजिनांनी फिरवली जातात. दोन्ही इंजिन मिळून चिनुक तब्बल ९.६ टन (९६०० किलोग्राम ) वजन उचलू शकते. ज्यात माणसं, दारुगोळा, तोफा, इंधन, पाणी, इतर सर्व रसद असणाऱ्या गोष्टी समाविष्ट आहेत. इतकं वजन उचलून ३०० किमी./ तास ह्या वेगाने हवेतून मार्गक्रमण करून एकाच उड्डाणात ६५० किलोमीटरचं अंतर कापण्यात सक्षम आहे. ह्यावर एम २४० मशीनगन असून शत्रूचा वेध घेण्यात अचूक मानली जाते.

चिनुक सी एच ४७ हेलिकॉप्टर भारतात येण्याने भारतीय हवाई दलाच्या क्षमतेत कमालीची वाढ झाली आहे. चिनुक हिमालय तसेच अतिपूर्वेकडील खडतर सिमावर्ती क्षेत्रात सैनिक, दारुगोळा, इंधन, इतर रसद ह्याची ने-आण करण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे. ह्या मध्ये ३३ सैनिक एका वेळेस एअर लिफ्ट होऊ शकतात. तर सैनिकी जिप, १०५ मिमी. हॉवीत्झर तोफ त्याच्या सगळ्या टीम सह उचलून नेण्याची ह्या हेलिकॉप्टर ची क्षमता आहे. भारताचा हिमालयीन भाग हा हेलिकॉप्टर चालवण्याच्या दृष्ट्रीने खूप खडतर मानला जातो. अश्या भागात दोन वेगवेगळे रोटर असलेलं चिनुक भारताच्या रसद पुरवठ्यामध्ये खूप सहजता आणणार आहे.