#CoupleChallenge : जोडप्यांनी सोशल मीडियावर फोटो टाकण्यापूर्वी विचार करा

0
270

सध्या सोशल मीडियावर #CoupleChallenge ट्रेण्ड होत आहे. हा चॅलेंज स्वीकारत नेटकरी आपल्या जोडीदारासोबतचा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आहेत. फेसबुक सुरू केले की, कपल चॅलेंजचे फोटोज समोर येत आहेत. याच काळात पुणे पोलिसांनी या ऑनलाइन मोहिमविषयी इशारा दिला आहे.

सोशल मीडियावर कपलने फोटो टाकण्यापूर्वी अनेक वेळा करावा असे पुणे पोलिसांनी सांगितले आहे. असामाजिक लोक या फोटोंचे मॉर्फ बनवू शकतात आणि ते अश्लील आणि इतर सायबर गुन्ह्यांसाठी वापरू शकतात. पुष्टी न झालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 2 दशलक्षाहूनही अधिक लोकांनी कपल चॅलेंज स्वीकारले आहे.

पुणे पोलिसांनी ट्विट करत फोटो शेअर करणाऱ्यांना असं करण्यापूर्वी दोन वेळा विचार करा असे सांगत जागरुक राहण्याचं आवाहन केलं आहे. नाहीतर कपिलचा खपलं चॅलेंज होईल, अशा शब्दांत इशारा देखील दिला आहे. त्यामुळे अशा चॅलेजवर फोटो टाकताना समोरच्याची खात्री असल्याशिवाय असे फोटो शेअर न करण्याची सूचना सायबर पोलिसांनी केली आहे. यापूर्वीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये असे फोटो मार्फिंग करुन ते पॉर्न साईटवर टाकले जातात़ त्याखाली महिला, तरुणींचा नंबर दिला जातो. त्यामुळे त्यांना मनस्ताप झाल्याचे प्रकरणे समोर आली होती. काही जणांनी बदला घेण्यासाठी असे कृत्ये केली होती, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.

ट्विट करत पुणे पोलिसांनी सांगितलं की, आपल्या जोडीदारासोबत फोटो पोस्ट करताना दोन वेळा विचार करा. गोड वाटणार चॅलेंज काळजी नाही घेतली तर चुकीचं ठरू शकते. तसेच ट्विट मध्ये एक फोटो शेअर करत त्यात लिहलं आहे की, ‘कपल चॅलेंज वाल्यांना सायबर क्रिमिनल चॅलेंज न करो, केला तर कपलचा खपलं चॅलेंज होईल’.