Mother’s Day : मातृदिन… काय आहे आजच्या दिवसाचे महत्त्व?

0
963

आई म्हणजे सहवास, आई म्हणजे नाव, गाव, आई म्हणजे आयुष्याची शिदोरी… इतर वेळी आई हा विषय आपण आपल्या सर्वसामान्य जगण्यात इतका गृहीत धरलेला असतो की, त्याची वेगळी अशी दखलही आपल्याला घ्यावी वाटत नाही. तसं तर प्रत्यके दिवस आईचाच असतो पण आजच्या धावपळीच्या जीवनात आम्ही आमच्या आईला जास्त वेळ देऊ शकत नाही. मुलांच्या आनंदसाठी त्या आईने आपल्या सर्व त्रासांकडे दुर्लक्ष केले तर आज तिच्यासोबतच करू हा खास दिवस.

मदर्स डेचा इतिहास काय?
मातृदिन हा पहिल्यांदा अमेरिकेत साजरा करण्यात आला होता. जेव्हा एना जार्विस नावाच्या मुलीने तिच्या आईचे स्मारक बांधले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. कारण, ती तिच्या आईची शेवटची इच्छा होती. नंतर, तिने आईच्या निधनानंतर तीन वर्षे असेच केले आणि त्यानंतर तिने सर्व मातांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरवात केली आणि हा दिवस अमेरिकेत मातृदिन म्हणून साजरा करण्यात आला.

हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा करण्यासाठी त्यांनी मोहीमही सुरु केली. मात्र, तिची ही विनंती नाकारली गेली होती. पण, 1941 मध्ये एका प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यात आली आणि हे जाहीर करण्यात आलं की आजपासून मे महिन्याचा प्रत्येक दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा केला जाईल.

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

आई आहे तर जगातील सर्व सुख आहे. आई वंदनीय आहे.खरं आहे.खरं तर तिला सन्मान देण्यासाठी कुठला खास दिवस कशाला पाहिजे ? ती तर दररोज सन्माननीय आहे. आदरणीय आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबाची ती काळजी घेते ,कष्ट करते ,घरासाठी राब- राब राबते. मुलांना चांगले संस्कार देते. ते म्हणतात ना की चोवीस तासापैकी अठरा तास काम करून सुद्धा कामाला कधी रजा घेत नाही आणि बिनपगारी आपल्या कुटुंबासाठी सदैव काम करते ती असते आई. किती बोलावे आणि किती कौतुक करावे तेवढे कमी पडतील अशी असते आई. जगातले सर्व सुख एकीकडे आणि आईच्या कुशीत घेतलेला विसावा किंवा आईने आपल्या हाताने जेवण भरवणे ह्यातील सुख एकीकडे. आपल्याला काय गोष्ट हवी आहे ते सांगण्या अगोदरच ज्या व्यक्तीला आधी समजते ती म्हणजे आई.

मातृदिन संपूर्ण विश्वात साजरे केले जाते. पाश्चिमात्यांच्या देशात आईचे आभार मानण्याची पद्धत आहे. आईला काही भेट वस्तू देणे, तिच्या सोबतीने वेळ घालवणे, अश्या पद्धतीने हा दिन अमेरिका आणि इंग्लंड सारख्या देशात मातृदिन म्हणून साजरा केला जातो.हा दिवस आपल्या आई वरचे प्रेम, तिची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. परंतु प्रश्न असा उद्भवतो की आपण आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त करू शकतो का ? ती आपल्या कुटुंबासाठी झटत असते कष्ट करते तरीही कधी थकत नाही. हास्य मुखाने आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी करत असते . तिच्या या कष्टाला मानाचा मुजरा.

आई हा शब्द बोलायला कितीही असला जरी सोपा
ती करत असते सारे काम म्हणून आपण काढतो झोपा

आईमुळे मिळतो आपल्या आयुष्याला आकार
त्याच आईचे स्वप्न आपण मिळून करूया साकार