Happy Teddy Day 2021: टेडी बिअरची कल्पना कधीपासून आली? कोणत्या रंगाचा टेडी काय दर्शवतो?

0
868

उद्याचा दिवस कोणता हे सहसा लक्षात न ठेवणारी काही मंडळी फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यापासूनच एका खास दिवसाच्या तयारीला लागतात. तो दिवस म्हणजे, व्हॅलेंटाइन्स डे. मुळात प्रेमाची उधळण करणारा हा दिवस उजाडण्यापूर्वी रोझ डे, प्रपोज् डे असा संपूर्ण आठवडाच साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीकच्या चौथ्या दिवशी अर्थात 10 फेब्रुवारीला ‘टेडी डे’ साजरा केला जातो. या खास दिवशी आपण आपल्या जोडीदारास किंवा खास व्यक्तीला टेडी गिफ्ट देऊ शकता. टेडी इतके गोंडस असतात की प्रत्येकाला ते आवडतात.

टेडी बिअरची कल्पना आली कुठून?

जागतिक पातळीवर ‘टेडी डे’ साजरा करण्यामागे मोठा इतिहास आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती थियोडोर रुझवेल्ट एकदा मिसीसिपीवरून लुसियानाची यात्रा करत होते. त्यावेळी त्यांना झाडावर तडफडत असलेले अस्वल दिसले. या अस्वलाला तडफडताना पाहुन रुझवेल्ट यांनी त्याला मारण्याचा आदेश दिला.

अस्वलाला होत असलेल्या वेदना लक्षात घेऊन रुझवेल्ट यांनी हा आदेश दिला होता. त्यानंतर ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण अमेरिकेत पसरली. या घटनेवर बेरीमेन नावाच्या व्यंगचित्रकाराने कार्टुन काढले. हे कार्टुन लोकांना खूपचं आवडलं. तसेच लहान मुलांच्या खेळण्या बनवणाऱ्या एका दुकानदाराच्या पत्नीने या अस्वलाचे खेळणे बनवले आणि त्याला ‘टेडी बियर’ असे नाव देण्यासाठी राष्ट्रपती रुझवेल्ट यांची परवानगी मागितली. कारण रुझवेल्ट यांचे टोपणनाव ‘टेडी’ होतं. त्यावेळी रुझवेल्ट यांनी या नावाला होकार दर्शवला. तेव्हापासून ‘टेडी बियर’ अस्तित्वात आला. जगातील पहिले टेडी बिअर अजूनही इंग्लंडच्या पीटरफिल्डमध्ये सुरक्षित ठेवले आहे. 1903 साली पहिला टेडी बिअर विक्रीसाठी ठेवण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत या टेडी बिअरची क्रेझ अजूनही आहे.

टेडी बिअर’ (Teddy Bear Gift) गिफ्ट करण्याआधी टेडी बिअरच्या रंगामागचा अर्थ जाणून घेणे गरजेचे आहे. या खास दिवशी आपण प्रत्येक रंगाच्या टेडी बिअरचा अर्थ आपण जाणून घेऊयात.

निळा टेडी बियर 

निळा टेडी गिफ्ट करणे म्हणजे जोडीदारावर तुमचे खूप प्रेम आहे, ही गोष्ट व्यक्त करणे. जर तुम्हालाही प्रेम व्यक्त करायचे असेल, तर आपल्या आवडत्या व्यक्तीस निळा टेडी भेट द्या.

हिरवा टेडी बियर 

हिरव्या रंगाचा टेडी भेट देणे म्हणजे आपण एखादा व्यक्ती आयुष्यात येण्याची वाट पाहत आहात. तर आपण आपल्या जोडीदाराला असे सांगायचे असेल की, आपण त्यांची वाट पाहत आहात, तर त्यांना हिरव्या रंगाचे टेडी पाठवा आणि नंतर त्यांच्या उत्तराची वाट पहा

रेड टेडी बियर 

लाल रंग हा प्रेमाचे प्रतिक मानला जातो. त्यामुळे तुम्ही टेडी डे च्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला लाल रंगाचा टेडी बियर देऊ शकता. त्यामुळे तुमच्या मनातील भावना तुमच्या जोडीदारापर्यंत पोहचण्यास मदत होईल. तुम्ही रेड टेडी देऊन तुमच्या प्रियकरांचे मन जिंकू शकता.

पिंक टेडी बियर

पिंक रंग हा मुलींचा आवडता रंग आहे. तसेच सध्या फेब्रुवारी महिना सुरू असून सर्वत्र गुलाबी थंडी जाणवत आहे. अशा गुलाबी थंडीत तुमच्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करण्यासाठी पिंक टेडी मोठं गिफ्ट ठरेल.

नारिंगी टेडी बियर

नारंगी रंग म्हणजे आनंद, सूर्यप्रकाश, सर्जनशीलता आणि उत्साह. जर आपण एखाद्यास प्रपोज करण्याची योजना आखत असाल, तर आपण त्यांना केशरी रंगाचा टेडी देऊ शकता.

पांढरा टेडी बियर 

पांढर्‍या रंगाचे टेडी गिफ्ट करणे म्हणजे आपण आधीपासून एखाद्याशी वचनबद्ध आहात आणि केवळ समोरच्या व्यक्तीशी मैत्री ठेवू शकता

काळा टेडी बियर

जर आपल्या जोडीदाराकडून आपल्याला ब्लॅक टेडी बेअर मिळाला, तर याचा अर्थ असा आहे की त्यांनी आपला प्रस्ताव नाकारला आहे.

जांभळा टेडी बियर 

जांभळा टेडी गिफ्ट करणे म्हणजे समोरचा आता आपल्यात रस घेणार नाही आणि आता त्याला या नात्यात पुढे जाण्याची इच्छा नाही.