International Men’s Day : मेन विल बी मेन; जागतिक पुरुष दिवस आणि त्याचा इतिहास

0
533

जागतिक महिला दिवस कधी असतो याचं उत्तर आपल्यापैकी अनेकांना माहित असेल. पण जागतिक पुरुष दिन कधी असतो या प्रश्नाचं उत्तर देताना विचार करावा लागेल किंवा माहितही नसेल. जागतिक पुरुष दिन 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. म्हणजेत आज जगभरात जागतिक पुरुष दिन साजरा करण्यात येत आहे. समाजात फक्त महिलाच नाही, ज्यांच्यावर अत्याचार होतो. आपल्या आजूबाजूला पाहिलं तर अनेक पीडित पुरुषही दिसतील. शोषण, पक्षपात, हिंसा, असमानता याची झळ पुरुषांनाही बसते. पुरुषांचं मानसिक आरोग्य, पुरुषत्वाच्या सकारात्मक गुणांचं कौतुक, समाजातील आदर्श पुरुषांना मुख्य प्रवाहात आणणं आणि लैंगिक समानता हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे.

कुटुंबाचा पोशिंदा, आधार अशी बिरुदे लावणाऱ्या पुरुषांकडून नेहमीच खंबीरपणाची अपेक्षा ठेवली जाते. पुरुषांची जबाबदारी, कर्तव्यांबाबत नेहमीच चर्चा होते. मात्र, त्यांच्या अधिकाराबाबत फारसे बोलले जात नाही.’ काही संकट आलं किंवा भावनिक प्रसंग निर्माण झाले तर पुरुषाची अवस्था अशीच काहीशी होते. तो आपलं दु:ख सांगू शकत नाही, व्यक्तही होऊ शकत नाही. पुरुषांच्या या सकारात्मक भावनेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास
जागतिक महिला दिन 8 मार्चला साजरा केला जातो. त्याच धरतीवर 1923 साली काही पुरुषांनी दरवर्षी 23 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्याची मागणी केली होती. पण त्यावेळी यावर काही निर्णय झाला नाही. सन 1991 साली हा दिवस साजरा करण्याची पुन्हा एकदा संकल्पना मांडण्यात आली. शेवटी 1999 पासून त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या नागरिकांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला आणि जगभरात याचे पालन सुरु झालं. डॉ. जीरोम तिलकसिंह यांचे या क्षेत्रातले योगदान लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांच्या जन्मदिवसानिमित्त 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतात सर्वप्रथम 2007 साली आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

अशाप्रकारे साजरा करा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस
परदेशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस विविध पद्धतीने साजरा केला जातो. भारतात आता कुठे या दिवसाला प्रसिद्धी मिळाली आहे. जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करायचा असेल तर त्याची सुरुवात आपल्या घरातून करा. घरातील पुरुष सदस्यांना ते खास असल्याची जाणीव करुन द्या. त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवा, गिफ्ट द्या किंवा छान मेसेज असलेलं कार्ड देऊनही तुम्ही हा दिवस साजरा करु शकता.