चीन आणि पाकिस्तान सावधान; भारतीय भूमीवर झाले राफेलचे हॅप्पी लँडिग

0
320

यापुढे भारतात घुसण्याचे धाडस करण्याआधी चीन-पाकिस्तान निश्चित दहा वेळा विचार करतील. भारताला हे बळ मिळालेय, ते ‘राफेल’मुळे. एकाच वेळी वेगवेगळी कामे करण्याच्या क्षमतेमुळेच ‘राफेल’ भारताचा बाहुबली आहे. येणार.. येणार.. म्हणून मागच्या दोन-तीन वर्षांपासून ज्याची चर्चा होती, ते ‘बाहुबली’ लढाऊ विमान अर्थात राफेल आज भारतात लँड झालं.

जमीन, पाणी आणि हवेतून शत्रूवर मारा करण्याची भारतीय लष्कराची ताकद राफेलमुळं आणखी वाढली आहे. भारतीय लष्कराची शस्त्रं शत्रूवर अणुहल्ला करण्यासाठी आधीपासून सज्ज होती. पण, आता वायुदलाच्या बाहुबली राफेलच्या येण्यानं ही ताकद आणखी वाढणार आहे.

जमीन, पाणी आणि हवेतून शत्रूवर मारा करण्याची भारतीय लष्कराची ताकद राफेलमुळं आणखी वाढली आहे. भारतीय लष्कराची शस्त्रं शत्रूवर अणुहल्ला करण्यासाठी आधीपासून सज्ज होती. पण, आता वायुदलाच्या बाहुबली राफेलच्या येण्यानं ही ताकद आणखी वाढणार आहे.

राफेल विमानांनी युएई येथून उड्डाण करताच काही वेळेतच भारतीय हवाईहद्दीत प्रवेश केला. जेव्हा ही विमान अरबी समुद्रावरुन भारतीय हद्दीत आले तेव्हा आयएनएस कोलकाता कंट्रोल रूममधून त्यांचे स्वागत करण्यात आले.

राफेल करार ह्या दिवशी झाला
23 सप्टेंबर 2016 रोजी भारताने फ्रान्सकडून 36 राफेल जेट विमानं विकत घेण्याचा करार केला. यासाठी भारताने 7.87 अब्ज युरो (अंदाजे 59,000 कोटी रुपये) मोजण्यास मान्यता दिली. कराराला दोन वर्षं पूर्ण झाली असली तरी ही विमानं प्रत्यक्ष भारतात येण्यासाठी आणखी एक वर्षाचा कालावधी आहे. भारत-फ्रान्स दरम्यान ३६ राफेल लढाऊ विमानांसाठी ७.८८ अब्ज युरोचा (सुमारे ५८,८५३ कोटी रुपये) करार झाला.

राफेलचं वैशिष्ट्य काय?

राफेल हे दोन इंजिन असलेलं अनेक कामं करू शकणारं मध्यम आकाराचं लढाऊ विमान आहे याला इंग्रजीत ‘मीडियम मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (MMRCA) म्हणतात. दसोच्या वेबसाइटवर राफेलचं वर्णन ‘ओमनीरोल’ असं केलं आहे. याचा ढोबळ अर्थ ‘सर्वगुणसंपन्न’ असा आहे. लांब असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याच्या दृष्टीनं या विमानांची निर्मिती करण्यात आली आहे.हवेतून मारा करणं, हवेतल्या हवेत इंधन भरणं, अण्वस्त्राचा हल्ला झाल्यावर संरक्षण, लक्ष्याच्या हालचाली टिपणं त्यांच्यावर अचूक मारा करण्याची क्षमता ही राफेलची वैशिष्ट्यं आहेत, असं दसोच्या वेबसाइटवर सांगितलं आहे.

हवेतून मारा करणं, हवेतल्या हवेत इंधन भरणं, अण्वस्त्राचा हल्ला झाल्यावर संरक्षण, लक्ष्याच्या हालचाली टिपणं त्यांच्यावर अचूक मारा करण्याची क्षमता ही राफेलची वैशिष्ट्यं आहेत, असं दसोच्या वेबसाइटवर सांगितलं आहे.

 

राफेल विमानांनी भारतीय भूमीला पहिला स्पर्श करतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत हे दृश्य भारतीयांपुढे ठेवले.