उज्ज्वल गॅस योजना काय आहे?

0
274

स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन’असा नारा देत केंद्र शासनाने  उज्ज्‍वला योजनेतंर्गत देशातील दारिद्रय रेषेखालील महिलांना मोफत घरगुती एल.पी.जी. गॅस उपलब्ध करुन देण्याचे काम केलं आहे. ग्रामीण व निमशहरी भागात स्वयंपाक करण्यासाठी आजही अनेक गावांत चुलींचा वापर केला जातो. ग्रामीण भागातील स्त्रिया पारंपारिक चुलीत जळणाऱ्या इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा बळी ठरत आहेत. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी ‘स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन’ असा नारा देवून केंद्र सरकारने 1 मे 2016 रोजी संपूर्ण भारतात प्रधान मंत्री ‘उज्ज्वला योजने’चा शुभारंभ केला.   

महिलांचे सक्षमीकरण व त्यांच्या आरोग्याची निगा राखणे, स्वयंपाक करताना लाकडी जळण वापरल्यामुळे होणारे तीव्र दुष्परिणाम कमी करणे, स्वयंपाकासाठी अस्वच्छ जळण वापरल्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करणे, घरात लाकडी जळण वापरल्यामुळे लहान बालकांना बऱ्याच मात्रेत होणाऱ्या श्वासोच्छवासाच्या तक्रारी दूर करणे हे सर्व उद्देश या योजनेचा आहे.  

उज्ज्वला’ ही गरिबी रेषेखालील कुटुंबांना, त्या कुटुंबातील महिलेच्या नावे सवलतीच्या दरात स्वयंपाकाचा एलपीजी गॅस मिळवून देणारी योजना आहे. या योजनेतून लाभधारकांना सिलिंडर, रेग्युलेटर आणि अन्य उपकरणांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाचा भार सरकार उचलते. याची एकूण किंमत ३२०० रुपये आहे. यात सरकार १६०० रुपये अनुदान देते.

उज्ज्वला गॅस योजनेसाठी कोण पात्र?

उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थी फक्त महिला असतील. गरीब कुटुंबातील महिला या योजनेसाठी नोंदणी करु शकतात. अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 18 वर्षे असले पाहिजे. एकाच घरात उज्ज्वला योजनेची एकापेक्षा जास्त कनेक्शन्स नसावीत.

उज्ज्वला योजनेसाठी कोणत्या कागदपत्रांची गरज?

उज्ज्वला योजनेसाठी E-KYC अनिवार्य आहेत. आधारकार्ड हे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तसेच द्रारिद्य्ररेषेखाली असलेल्या कुटुंबांसाठी सरकारकडून देण्यात आलेले केशरी रेशनकार्डही गरजेचे आहे. लाभर्थी कुटुंबातील सदस्यांची ओळखपत्रेही गरजेची आहेत. कुटुंबातील महिलेच्या बँक खात्याचा क्रमांक आणि IFSC कोड देणे बंधनकारक असेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला केवळ एक अर्ज आपल्या जवळच्या एलपीजी वितरण केंद्रावर जाऊन सादर करावयाचा आहे. एलपीजी केंद्रावर अर्ज नि:शुल्क मिळतो. अथवा ऑनलाईन अर्ज भरता येतो. अर्ज सादर करताना अर्जदाराला आपले संपूर्ण नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर, जन-धन बँक खात्याचे नंबर देणे बंधनकारक आहे. योजनेंतर्गत भरलेले अर्ज एसईसीसी 2011 या डाटासोबत जोडून तपासण्यात येतात. त्या आधारावर लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र किंवा अपात्र ठरविण्यात येतात. अर्ज सादर करताना अर्जदार वयाची 18 वर्षे पूर्ण केलेला असावा. तसेच दारिद्र रेषेखालील महिलांनी अर्ज करणे आवश्यक आहे. प्रधान मंत्री उज्ज्‍वला योजनेच्या पात्र लाभार्थ्याला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन खरेदी करण्याकरिता 1600 रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात येणार आहे.

अर्जदार कुटुंब दारिद्र्य रेषेखालील असलं पाहिजे. कोणत्याही बँकेत अर्जदाराचं खातं असणं आवश्यक आहे. तर अर्जदाराच्या नावावर आधीपासून कोणतंही एलपीजी गॅस कनेक्शन नसावं.

आवश्यक कागदपत्रे

बीपीएल रेशन कार्ड असणे आवश्यक

फोटो आयडी – आधार कार्ड, मतदान कार्ड

पासपोर्ट साईजचा फोटो

रेशन कार्डची एक झेरॉक्स प्रत

एक प्रतिज्ञापत्र

एलआयसी पॉलिसी, बँक खात्याचा तपशील

बीपीएल मध्ये नाव असलेल्या यादीची एक प्रत.

ऑनलाईन पद्धतीने उज्ज्वल गॅस योजनेचा अर्ज तुम्ही कशाप्रकारे भरू शकता याची माहिती आपण आता घेऊयात 

> तुम्हाला आधी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

>> pmujjwalayojana.com वर क्लिक करा.

>> होमपेजवर डाऊनलोड फॉर्मवर जा आणि त्यावर क्लिक करा.

>> डाऊनलोड फॉर्मवर क्लिक केल्यानंतर पीएम उज्ज्वला योजनेचा फॉर्म येईल.

>> आता फॉर्ममध्ये तुमचे नाव, ई-मेल आयडी, फोन नंबर आणि कॅप्चा भरा.

>> आता OTP जनरेट करण्यासाठी बटणावर क्लिक करा.

>> त्यानंतर फॉर्म डाऊनलोड करा.

>> फॉर्म जवळच्या एलपीजी गॅस एजन्सीला सबमिट करा

तर मित्रांनो अश्या प्रकारे वरील प्रमाणे तुम्ही उज्ज्वला योजना २०२१ साठी ऑनलाइन प्रकारे फॉर्म डाऊनलोड करून भरू शकता आणि उज्ज्वल गॅस योजनेचा लाभ घेऊ शकता.