केरळ विमान अपघात: टेबलटॉप रनवे कशाला म्हणतात? का असतो तो धोकादायक?

0
513

केरळच्या कोझिकोडमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात दोन वैमानिकांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार वंदे भारत मिशन अंतर्गत एअर इंडिया एक्स्प्रेसचे AXB1344, बोईंग ७३७ दुबईहून कोझिकोडकडे येत होते. या विमानात १८४ प्रवासी आणि २ वैमानिकांसह क्रूचे ६ सदस्य होते. हे विमान कोझिकोड येथे पोहोचले आणि रनवे पार करून भिंतीवर धडकले. त्यामध्ये विमानाचे दोन भाग झाले आणि दरीत कोसळले. दरम्यान, या अपघाताचं कारण टेबलटॉप रनवे असल्याचं म्हटलं जात आहे. अशाप्रकारचे रनवे धोकादायक असल्याचं म्हटलं जातं.

टेबलटॉप रन वे म्हणजे काय?

कोळीकोड विमानतळाची धावपट्टी हा एक टेबलटॉप रनवे आहे. टेबलटॉप रन वे म्हणजे असा रन वे जो एका पठारावर असून त्याच्या टोकांना उतार व दरीसारखा खोलगट भाग आहे.सामान्यपणे विमातळाची उभारणी ही मैदानी अथवा सपाट भागावर केली जाते. मात्र डोंगराळ भागांमध्ये सपाट जागा नसल्यानं डोगराच्या वरील भागात असे विमानतळ उभारले जातात. या विमानतळावरील रनवेच्या आसपास डोंगर उतार असतो. अशा परिस्थितीत रनवेच्या एका किंवा दोन्ही बाजूंना डोगर उतार असू शकते. टेबलटॉप रनवे संपल्यानंतर पुढे फारशी जागा नसते. अशा रनवेवर विमान उतरवणं हे वैमानिकांचं कौशल्य मानलं जातं. या रनवेवर लँडिंग करताना किंवा उड्डाण करताना खूप खबदारी घ्यावी लागते.

देशातील अशी तीन विमानतळ

देशात अशी तीन विमानतळ आहेत जी अत्यंत उंच भागात स्थित आहेत आणि त्यांना टॅबलेटॉप रनवे म्हणतात. त्यातील एक म्हणजे केरळमधील मलप्पुरममधील कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे जेथे शुक्रवारी संध्याकाळी मोठा अपघात झाला. विमानतळ जिल्ह्यातील करीपूर येथे असून कोझिकोडपासून सुमारे २ कि.मी. अंतरावर आहे. असे दुसरे विमानतळ कर्नाटकमधील मंगरुरु येथे आहे, तर तिसरे विमानतळ मिझोरममध्ये आहे. या विमानतळांचे नैसर्गिक सौंदर्य पर्वत पर्वतांच्या दरम्यान बनविलेले आहे, परंतु येथे धोका तितकाच जास्त आहे.

याआधी मंगलोरमध्ये 22 मे 2010 रोजी एयर इंडिया एक्स्प्रेस विमानाला असाच अपघात झाला होता आणि ते विमान रनवेवरून घसरून पुढे दरीत कोसळलं होतं.

का असतो हा रनवे धोकादायक?

टेबलटॉप रनवे वरील विमानांचं लँडिंग हे धोकादायक मानलं जातं. कारण या ठिकाणी विमान उतरवताना अनेकदा ऑप्टिकल इल्युजन निर्माण होतो. तसंच विमान उतरवताना व्हिज्युअल रेफरंसमध्ये बदल होतो. वैमानिकासमोर विमान खुप वर किंवा खाली नेण्याचं एक आव्हान असतं. तसंच रात्रीच्या वेळी आणि पावसामध्ये अशा ठिकाणी विमान उतरवणं हे खुप आव्हानात्मक ठरू शकतं.

जसं आपण रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंग असतं, तिथूनच तो ओलांडणं अपेक्षित असतं, तसंच रन वेवरही एक झेब्रा क्रॉसिंग बनवलेलं असतं, त्याला थ्रेशहोल्ड असं म्हणतात. त्याच्या आत विमानानं जमिनीवर ‘टच डाऊन’ करणं अपेक्षित असतं. म्हणजे ते विमान रनवे संपण्याआधी थांबतं. “विमान थ्रेशहोल्ड ओलांडून मग जमिनीवर टेकलं असेल तर काही सेकंदात पुन्हा वेग वाढवून हवेत झेपावू शकतं आणि मग उतरण्यासाठी पुन्हा प्रयत्न करू शकतं. डोंगराळ भागात, किंवा टेकडीच्या माथ्यावर हे रनवे असल्यानं विमान उतरवताना वैमानिकांना असा रनवे टेकडीखालच्या भागातील जमिनीच्या पातळीवरच असल्याचा भास होतो. त्यामुळं अपघात होण्याची शक्यता असते.