सध्या कोरोनाचे संकट अद्याप काही संपलेले नाही. त्यातच सरकारने मंगळवारपासून नाईट कर्फ्यू लागू केला. २२ डिसेंबर ते ५ जानेवारीदरम्यान हा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा नवा व्हायरस अधिक वेगाने पसरत असल्याची माहिती पुढे आल्यानंतर संपूर्ण जगात काळजी घेतली जात आहे. अनेक देशांनी यूकेमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. भारताने ही काळजी म्हणून विमानांवर बंदी घातली आहे. ख्रिसमससाठीही सरकारने नियमावली जाहीर केली आहे. ख्रिसमस म्हणजे येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस. हा सण चर्चेमध्ये साजरा केला जातो. त्यासाठीही नियम लावण्यात आले आहे.
ख्रिसमस सणासाठी अशी आहे नियमावली:
- चर्चेमध्ये एकावेळी केवळ ५० जण प्रार्थनेसाठी उपस्थित राहू शकतात
- चर्चेमध्ये मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक
- चर्चमधील एका कॉयरमध्ये (गायन स्थळ) १० पेक्षा अधिक लोकांचा समावेश असता कामा नये. तसेच यावेळी वापरले जाणारे माईकही सॅनिटाईज केलेले असावेत
- प्रार्थनेपूर्वी चर्चचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक
- चर्चेच्या बाहेर दुकाने, स्टॉल लावण्यास मनाई
- सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर गर्दी करणे टाळावे.