माघी गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर

0
262

अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने मंगळवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात गणेश मूर्ती आणि मंडपांच्या आकारावर निर्बंध घालण्यात आले आहे. त्याचबरोबर उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

गणेशमूर्ती, मंडपाच्या आकारावर निर्बंध ठेवण्यात आले आहे. मंडपात एका वेळी 10हून अधिक कार्यकर्ते नसावेत, असं देखील राज्य सरकारने सांगितले आहे. तसेच माघी गणेशोत्सवात मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.

१५ फेब्रुवारीपासून माघी गणेशोत्सव सुरु होतोय. त्यासाठी राज्य सरकारनं नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार मंडप उभारणीसाठी पालिकेची किंवा स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. मंडप मर्यादित आकाराचा असावा, आगमन-विसर्जन मिरवणुका काढता येणार नाही. सार्वजनिक मूर्तीची उंची चार फूट तर घरगुती मूर्तीची उंची दोन फूट असावी, शक्य असल्यास धातूच्या किंवा संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

ही आहे नियमावली:

  • मंडप उभारणीसाठी पालिकेची अथवा स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
  • मंडप मर्यादित आकाराचा असावा, आगमन-विसर्जन मिरवणुका काढता येणार नाही, सार्वजनिक मूर्तीची उंची चार फूट तर घरगुती मूर्तीची उंची दोन फूट असावी, शक्य असल्यास धातूच्या किंवा संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
  • मंडपात एका वेळी १० पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि १५ पेक्षा अधिक भाविक नसावे.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी सामाजिक उपक्रम, रक्तदान किंवा आरोग्य शिबीर अशा कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे.
  • ऑनलाइन किंवा केबल नेटवर्कच्या माध्यमातून दर्शनाची सोय करावी, मंडपात सामाजिक अंतराचे पालन करावे, वेळोवेळी मंडपाचे र्निजतुकीकरण करावे, येणाऱ्या भाविकांची तापमान तपासणी, मुखपट्टीचा वापर, स्वच्छतेचे नियम आदींबाबत दक्षता बाळगावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.
  • विसर्जनालाही केवळ पाच कार्यकर्त्यांना परवानगी असेल. शिवाय ज्यांना शक्य असेल त्यांनी घरीच गणेश विसर्जन करावे असे नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.