कोरोना: करदात्यांना दिलासा, ATM, बँक खात्यांबाबत अर्थमंत्र्यांनी केल्या घोषणा

0
377

कोरोना व्हायरसमुळे देशभरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. संकटात सापडलेल्या उद्योगांना पॅकेज जारी करण्यासाठी मंत्रालय सध्या काम करत आहे. लवकरच यावर घोषणा केली जाईल. सोबतच, आयकर रिटर्न भरण्याची तारीख आता 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पॅन-आधार जोडणी, जीएसटी आणि आयकर रिटर्नसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता करदात्यांना ३० जूनपर्यंत रिटर्न फायलिंगसाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. यापूर्वी ३१ मार्च ही अंतिम मुदत होती. वर्षभरातील सर्व आर्थिक कामे पूर्ण करण्याची शेवटची मुदत ३१ मार्च २०२० होती. मात्र दोन आठवड्यात सध्या देशभर ‘करोना’चा प्रादुर्भाव झाल्याने लॉकडाउनची समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक कामे पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिल्लीत केली. आधार आणि पॅन क्रमांक लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. . त्यानुसार, आता आधार-पॅन लिंक करण्यासाठी ३१ मार्च ऐवजी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

  • 3 महिन्यांपर्यंत कुठल्याही एटीएमवरून पैसे काढण्यास चार्ज लागणार नाही
  • खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणे आता बंधनकारक नाही
  • आयटीआर रिटर्न फाइल करण्यासाठी 30 जून पर्यंतची मुदवाढ
  • पॅन-आधार लिंक करण्याची तारीख सुद्धा 30 जून पर्यंत वाढली

त्याचबरोबर ग्राहकांना कोणत्याही बँकेच्या ATM मधून अतिरिक्त शुल्काशिवाय पैसे काढण्यास मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी बँकेकडून ग्राहकांना ३ ते ५ ATM व्यवहार निःशुल्क देण्यात येत होते. इतर बँकेच्या ATM मधून पैसे काढण्यास ग्राहकांना शुल्क द्यावे लागत होते. मात्र आता करोना आणि देशभरातील लॉक डाऊनमुळे बँकिंग नियमावलीत सूट देण्यात आली आहे. यामुळे देशातील कोट्यावधी ग्राहकांना फायदा होणार आहे. आता बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यात किमान रक्कम (मिनिमम बॅलेन्स) ठेवण्याची गरज नाही. तसेच डेबिट कार्डधारकांना पुढील तीन महिने कोणत्याही बँकेच्या एटीएममधून विनाशुल्क पैसे काढता येणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले