बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज काय आहे आणि त्याची सुरुवात कधी झाली?

0
748

सध्या लॉकडाऊन नंतर शेअर मार्केटची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. तसेच हर्षल मेहता स्कॅम या वेबसिरीजनंतर तरुणाई सुद्धा यावर चर्चा करताना दिसत आहे . आज आपण शेअर मार्केट संबंधित बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज काय आहे आणि त्याची सुरुवात कधी झाली याविषयी माहिती घेणार आहोत

मुंबईला भारताची आर्थिक राजधानी बनवण्यामागे मुंबई शेअर मार्केटचा मोठा वाटा आहे. ९ जुलै १८७५ रोजी मुंबई शेअर बाजाराची स्थापना झाली. तेव्हा शेअर बाजाराचं नाव होतं ‘द नेटीव शेअर अॅन्ड स्टॉक ब्रोकर्स’. १९ व्या शतकात उद्योगपती प्रेमचंद रॉयचंद हे ‘द नेटीव शेअर अॅन्ड स्टॉक ब्रोकर्स’चे संस्थापक सदस्य होते. प्रेमचंद हे त्याकाळी ‘कॉटन किंग’ या नावाने प्रसिद्ध होते.

१८७४ च्या आसपास वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर होऊन सध्याच्या दलाल स्ट्रीट येथे व्यवहार करायचे ठरवले आणि त्यानंतर ‘द नेटीव शेअर अ‍ॅन्ड स्टॉक ब्रोकर्स’ही संस्था १८७५ मध्ये स्थापन होऊन व्यवहार सुरू झाले. प्रेमचंद रॉयचंद हे व्यापारी ‘द नेटीव शेअर अ‍ॅन्ड स्टॉक ब्रोकर्स’चे संस्थापक सदस्य होते. ‘द नेटीव शेअर अ‍ॅन्ड स्टॉक ब्रोकर्स’ची सुरुवात २५ शेअर दलालांनी अवघ्या एका रुपयात केली होती. अशा तर्‍हेने भारतातील पहिला मान्यताप्राप्त शेअर बाजार अस्तित्वात आला. मुबंई स्टॉक एक्सचेंज हे आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्स्चेंज आहे. मुंबई शेअर मार्केटला जगातील सर्वात वेगवान स्टॉक एक्स्चेंज मानले जाते. बीएसईचा वेग ६ मायक्रो सेकंद आहे.

मुंबई शेअर बाजाराचं जन्मस्थान हे १८५० मध्ये एक वडाच्या झाडाखाली आहे . सद्या हे ठिकाणहार्निमन सर्कलनावाने ओळखलं जातं . टाऊन हाॅलजवळ वडाच्या झाडाखाली प्रेमचंद राॅयचंद आणि इतरदलाल लोक एकत्र येऊनवेगवेगळ्या धंद्यांची दलाली करायचे.

मुंबई शेअरबाजारात नोंदणीकृत शेअर्सची संख्या जास्त त्यामानाने उलाढाल कमी तर राष्ट्रीय शेअरबाजारात नोंदणीकृत शेअर्सची संख्या कमी पण उलाढाल जास्त त्यामुळे तेथे अधिक चांगला खरेदी किंवा विक्री भाव मिळण्याची शक्यता असते. दोन्हीकडे नोंदवण्यात आलेल्या शेअर्सबाबत ही शक्यता आहे. कंपनी कायद्याप्रमाणे ज्यांचे व्यवहार देशभरातून कोठूनही करता येतील अशा एका बाजारात नोंदवणे गरजेचे आहे. त्यामुळे यातील एकाच बाजारात नोंदवलेल्या शेअर्सची खरेदी विक्री त्याच बाजारात करता येते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये 5 हजार पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत. BSE च्या निर्देशांकाला सेन्सेक्स असे म्हटले जाते.

ब्रिटिशांच्या काळात 18 जानेवारी 1899 ला ब्रिटिश अधिकारी जे. एम. मेक्लिन यांनी मुंबईतला शेअर बाजार अधिक चांगल्या पद्धतीने चालावा यासाठी मदत केली. त्यांनी स्थानिक शेअर दलालांना सन्मानाचं स्थान देण्याचा प्रयत्न केला. हा त्या काळातला भारतातला सगळ्यात मोठा गुंतवणूक बाजार होता. आजच्या मुंबईच्या उभारणीतही या शेअर बाजाराने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.