Budget 2021 : काय महाग आणि काय स्वस्त झाले आहे ते जाणून घेऊयात?

0
499

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार सामान्यांच्या जीवनात काही महत्त्वाचे बदल होणार आहेत.परंतु अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांच्यावर काही परिणाम झाला असेल. जसे पूर्वी व्हायचे. सोने-चांदी, भांडी, लेदरच्या वस्तू स्वस्त होतील, तर मोबाईल, सोलार इन्व्हर्टर आणि वाहने महाग होणार आहेत. खरं तर, तीन वर्षांपूर्वी आलेल्या जीएसटीने वस्तू आणि सेवा महाग करण्याची शक्ती बजेटमधून काढून घेतली आहे. आता 90% वस्तूंच्या गोष्टी GST निश्चित करते. परंतु परदेशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर आयातीवरील शुल्काचा परिणाम होतो आणि अर्थसंकल्पात याची घोषणा केली जाते. म्हणून, पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी आणि इंपोर्टेड वस्तू जसे की – मद्य, फुटवेअर, सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, मोबाईल, रसायने, कार, तंबाखू यासारख्या आयात केलेल्या वस्तूंच्या किंमतींवर बजेटच्या घोषणांचा परिणाम होतो. केवळ यावरच सरकार आयात शुल्क वाढवते किंवा कमी करते. या अर्थसंकल्पात देखील अर्थमंत्र्यांनी हेच केले आहे.

पेट्रोल-डिझेल महागणार
पेट्रोल-डिझेल महागणार आहे म्हणजे सर्वच महागणार हे साधं गणित आहे. पेट्रोलवर अडीच रुपये तर डिझेलवर चार रुपयांचा अधिभार लावण्यात येणार आहे. मात्र दिलासादायक म्हणजे, हे अधिभार लावताना आधीचे अधिभार जसे एक्साईज ड्युटी आणि स्पेशल अतिरिक्त एक्साईज ड्युटी हटवण्यात येईल असं निर्मला सीतारमण म्हणाल्या. पेट्रोल सध्या ऑल टाईम हाय आहे. मुंबईत पेट्रोल जवळपास 93 रुपये लिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेलचा दर 84 च्या घरात आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काही ऑटो पार्ट्सवर 15% पर्यंत इंपोर्ट ड्यूटी वाढवली आहे, यामुळे वाहने महाग होतील. सोलार इन्व्हर्टर महाग होईल, कारण यावरही इंपोर्ट ड्युटी 20% पर्यंत वाढवण्यात आली आहे. मोबाईल फोनचे चार्जर आणि हेडफोनवरील इंपोर्ट ड्युटी 2.5% वाढवली आहे, यामुळे या गोष्टी देखील महाग होतील.

सोने-चांदीवरील इंपोर्ट ड्युटी 12.5% कमी केली असल्याचे दागिने स्वस्त होतील. स्टील उत्पादनावरील इंपोर्ट ड्युटी कमी करून 7.5% करण्यात आली आहे. तांब्यावरील इंपोर्ट ड्युटी 2.5% कमी केली आहे. निवडक लेदरला कस्टम ड्युटीतून वगळण्यात आले आहे. यामुळे लेदरच्या वस्तू स्वस्त होतील.

काय स्वस्त?
आयर्न स्टील कस्टम ड्युटीत सूट मिळणार आहे. शिवाय तांब्यावरील कस्टम ड्युटीत सूट दिल्याने तांब्याच्या वस्तू स्वस्त होतील. कपड्याच्या हातमागावर सूट मिळणार आहे. केमिकलवरील कस्टम ड्युटी, तसंच सोने-चांदीवरील स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा , चामड्याच्या वस्तूवरी कस्टम ड्युटी कमी होणार आहे.
त्यामुळे या वस्तू स्वस्त होतील.

घरे
परवडणाऱ्या घरांच्या व्याजाची मर्यादा वाढवली, एक वर्षापर्यंत सूट वाढवण्यात आली आहे. परवडणारी घरं आणि भाड्याची घरं जुलै 2019 मध्ये 1.5 लाखाच्या व्याजावर सूट देण्यात आली. जर तुम्ही घर खरेदी करणार असाल, तर कर्ज 2022 पर्यंत घेणार असाल तर तुम्हालाही या सुविधेचा लाभ मिळेल

टॅक्स स्लॅब
यंदाच्या टॅक्सस्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 75 पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना करमाफीची घोषणा निर्मला सीतरमण यांनी केली. पेन्शननं कमाई असलेल्यांसाठी कर भरावा लागणार नाही.

शेती
मोदी सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट MSP देण्याची घोषणा केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. 2020-21 मध्ये शेतकऱ्यांना 75 हजार 060 कोटी रुपये गहू साठी देण्यात आले. 2020-21 मधील खरेदी सुरु, केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर धान्य खरेदी केली, असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.

काय गोष्टी स्वस्त होणार?
चामड्याचं उत्पादन स्वस्त होणार
ड्राय क्लिनिंग स्वस्त होणार
लोखंडाचं उत्पादन स्वस्त होणार
रंग स्वस्त होणार
स्टीलची भांडी स्वस्त होणार
इंश्युरन्स स्वस्त होणार
वीज स्वस्त होणार
चप्पल स्वस्त होणार
नायलॉन स्वस्त होणार
सोनं-चांदी स्वस्त होणार

या गोष्टी महागणार?
मोबाइल आणि चार्जर महागणार
तांब्याच्या गोष्टी महागणार
इलेक्ट्रॉनिक सामान महागणार
कॉटनचे कपडे महागणार
रत्न महागणार
लेदलच्या गोष्टी महागणार
सोलर इन्वर्टर महागणार