आंब्याच्या रेसिपी: आंब्याचा शिरा आणि दूध आंबा हे नक्की करून पाहा

0
1111

सध्या आंब्याचा सिजन सुरू असल्याने बाजारात आंब्याची चंगळ दिसते. आंबा या फळाला सगळ्या फळांचा राजा म्हणून ओळखले जाते. जगातील सर्वात जास्त हापूस आंब्याचे उत्पादन महाराष्ट्रात होते. आंबा हे फळ आवडत नाही असे म्हणाणारे माणसं विरळंच. आंबा प्रकृतीला उष्ण असला तरी आंब्याने वजन आणि शुगरचे प्रमाण वाढते. हे माहित असले तरी आंबे खाण्याचा मोह आवरत नाही. याच आंब्याच्या काही रेसिपी..

आंब्याचा शिरा:

साहित्य
१ वाटी रवा, दिड वाटी आंब्याचा रस, १ वाटी दुध, दिड वाटी पाणी, अर्धा वाटी साखर, ४-५ बदाम, चिमुटभर केशरआणि तूप

  • कृती
  • कढईत तूप गरम करून त्यात रवा मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या.
  • दुसऱ्या भांड्यात पाणी आणि दुध एकत्र करून उकळून घेतल्या नंतर त्यात रव्यात टाका.
  • रवा शिजून घट्ट झाल्यावर त्यात साखर आणि आंबा रस घालून अजून थोडा वेळ शिजू द्या.
  • सजावटीकरिता केशर आणि बदाम टाकून सजावा.
  • तुमची शिरा डिश तयार आहे.

दूध आंबा:- ( आंब्याचे शिकरण)

साहित्य:
5 हापूस आंबे, (हापुसच), दूध अर्धा ली. , साखर दोन चमचे

  • कृती:
  • आंबे स्वच्छ धुवावेत.
  • दोन बाजू कापून घ्याव्यात, त्यावर उभ्या आडव्या फोडी होतील अशा सुरीने रेषा माराव्यात.
  • चमच्याने भांड्यात काढून घ्याव्यात.
  • दोन्ही कडा पण कापून त्याच्या फोडी करून घ्याव्यात .
  • कोयीचा रस काढून घ्यावा.
  • दूध न तापवता गार करून घ्यावे. फोडी आणि रस एकत्र करावा.
  • त्यात दूध आणि साखर घालावे.
  • नीट मिक्स करावे आणि गारेगार खावे.
  • एक नवीन सोपी स्वीट डिश, अजून शाही करायचे तर देताना आईसक्रीम चा गोळा ठेवा.
  • चविनुसार साखर वाढवण्यास हरकत नाही.