तांदूळ तीन रुपये,गहू दोन रुपये किलो दराने मिळणार:केंद्र सरकारचा निर्णय

0
394

(केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा)

कोरोनाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रत्येक प्रयत्न करत आहे. देशामध्ये कोरोना विषाणूने कहर केला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. याच दरम्यान बुधवारी मोदी सरकारने मोठी घोषणा केली. देशातील ८० कोटी नागरिकांना केंद्र सरकारकडून रेशन दिले जाणार आहे. २ रुपये दराने प्रतिकिलो गहू तर ३ रुपये दराने प्रतिकिलो तांदूळ देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. २७ रुपये किलोचा गहू २ रुपये किलोने देणार तर ३७ रुपये किलोचा तांदूळ ३ रुपये किलोने देणार अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. सरकारी संस्थांमध्ये जे कंत्राटी कामगार आहेत त्यांनाही पगार दिला जाईल. खासगी कंपन्याही यासाठी सकारात्मक आहेत. असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं.

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषद घेत प्रकाश जावडेकरांनी सांगितले की, ‘केंद्र सरकार देशातील ८० कोटी लोकांना महिन्याला प्रति व्यक्ती ७ किलो रेशन देणार आहे. तसंच, सरकार २७ रुपयांचे गहू २ रुपये प्रतिकिलो दराने देणार आहे. तर ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ देणार आहे. यावर सरकार १ लाख ८० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

प्रकाश जावडेकरांनी पुढे सांगितले की, कोरोना रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. लॉकडाऊन दरम्यान, अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही सामानाचा तुटवडा पडू नये यासाठी राज्य सरकार देखील प्रयत्नशील आहेत. लॉकडाऊन सध्याच्या काळात गरजेचे असल्याचंही ते म्हणाले. तीन महिन्याचं धान्य पुरवण्यात येणार असून अफवांपासून सावध राहण्याचं आवाहन जावडेकर यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे आवश्यक वस्तूंची दुकानं 21 दिवस चालू राहणार असल्याचा पुनरूच्चार प्रकाश जावडेकर यांनी केला.
.