Indian Railways: आता ट्रेनमध्ये पुन्हा घेता येणार आवडीच्या जेवणाचा आस्वाद

0
269

कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या आजारामुळे भारतीय रेल्वे (Indian Railway) गाड्यांमध्ये बंद असलेली इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिस्ट कॉर्पोरेशन (IRCTC) ची ई-केटरिंग (E-Catering) सुविधा पुन्हा सुरू होणार आहे. भारतीय रेल्वेने यासाठी आयआरसीटीसीला परवानगी दिली आहे. 1 फेब्रुवारीपासून 250 रेल्वेमधील प्रवाशांना ही सुविधा 65 स्टेशनवर मिळत आहे. महाराषट्रातील नागपूर स्टेशनची यासाठी निवड करण्यात आली. प्रवासी ई-कॅटरिंग मोबाइल अँप ‘फूड ऑन ट्रॅक’ च्या ( Food on Track app) माध्यमातून तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑर्डर करता येणार आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार एसी बोगीमध्ये गाड्या, ब्लँकेट, उशा आणि चादरी पुरवणे बंद केले होते, परंतु आता भारतीय रेल्वेने ट्रेनमध्ये ई-केटरिंग सेवा पुनरुज्जीवित केल्या आहेत.आयआरसीटीसीच्या या सुविधेद्वारे प्रवासी आपल्या आवडीच्या रेस्टॉरंटमधून ऑनलाइन ऑर्डर करू शकतात. ऑर्डर करताना प्रवाशांना कोणत्या स्टेशनवर आणि कोणत्या वेळी त्यांचे भोजन येईल याबद्दल सांगितले जाईल. खाण्यासाठी प्रवाशांना कुठेही जाण्याची गरज नाही. आयआरसीटीसीने काही रेल्वे स्थानकांवर ई-केटरिंग सेवा सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाकडे परवानगी मागितली होती, जी रेल्वे मंत्रालयाने मान्य केली आहे.

आयआरसीटीसी वेबसाइट – www.ecatering.irctc.com वर किंवा दूरध्वनीद्वारे या सेवेचा लाभ घेता येणार आहे. तसेच ‘फूड ऑन ट्रॅक’ अ‍ॅपवर आयआरसीटीसी ई-कॅटरिंग सेवा देखील उपलब्ध आहे.

कोविड संकटाच्या वेळी भारतीय रेल्वेने बंद केलेली ई-कॅटरिंग सेवा आता 1 फेब्रुवारीपासून निवडक स्थानकांवर पुन्हा सुरू केली आहे. प्रवाशांना अधिक चांगली व प्राधान्य दिली जाणारी ही सेवा असणार आहे. केटरिंग पुरवण्यासाठी सर्व सुरक्षाविषयक नियम पाळत ही सेवा सुरू केली आहे, रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.