चवीप्रमाणे आरोग्यासाठीही उत्तम; स्ट्रॉबेरी खा आणि फिट राहा

0
571

थंडीच्या मोसमात लालचुटुक रंगाच्या स्ट्रॉबेरी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. आपल्याकडे महाबळेश्वर, पाचगणीमध्ये स्ट्रॉबेरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. सध्या स्ट्रॉबेरीचा मोसम असून, चांगल्या दर्जाची स्ट्रॉबेरी फळ बाजारात सहज मिळते. स्ट्रॉबेरी केवळ चविला चांगली लागते म्हणून खायची नाही तर, तिचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत.

हे आहेत स्ट्रॉबेरीज खाण्याचे नेमके फायदे:

  • इतर फळांप्रमाणे स्ट्रॉबेरीमध्येही व्हिटॅमिन C असतं, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
  • आर्थरायटिस फाऊंडेशनच्या मते, स्ट्रॉबेरीज खाल्ल्याने सांधेदुखी कमी होते.
  • स्ट्रॉबेरीजमुळे adiponectin आणि leptin या फॅट बर्निंग हार्मोनची निर्मिती वाढते. भूक, ब्लड शुगर कमी होते आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे वजन कमी होतं.
  • स्ट्रॉबेरीजमध्ये फायबर भरपूर असतात ज्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते आणि मलावरोधाची समस्या उद्भवत नाही.
  • स्ट्रॉबेरीमधील वेगवेळी अँटीऑक्सिडंट केसगळती रोखतात. केसांना मॉईश्चराइझ करतात आणि केसातील कोंड्यापासून संरक्षण देतात.
  • स्ट्रॉबेरीमुळे वजनावर नियंत्रण मिळवण्यास फायदा होतो.
  • स्ट्रॉबेरीत मँगेनिज हे खनिजद्रव्य आहे त्यामुळे हाडांचा ठिसूळपणा कमी होतो, तसेच हाडं दुखण्याचा त्रासही कमी होतो म्हणून थंडीत स्ट्रॉबेरी भरपूर खावी.
  • स्ट्रॉबेरीत असणारे अँटीऑक्‍सीडेंट, फ्लेवोनॉइड, फोलेट आणि केंफेरॉल ही तत्व कॅन्सर होण्यास कारणीभूत असणाऱ्या पेशी नष्ट करतात.
  • स्ट्रॉबेरीमध्ये हृदयाला निरोगी ठेवणारे असे अँटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी होतो. रक्ताच्या गुठळ्या होत नाही, त्यामुळे स्ट्रोकचा धोका उद्भवत नाही.
  • स्ट्रॉबेरीमध्ये आयोडिन, व्हिटॅमिन सी आणि फायटोकेमिकल्स असतात, ज्यामुळे nervous system चं कार्य चांगलं राहतं. मेंदूला योग्य रक्तपुरवठा होतो आणि मेंदूचं कार्य सुधारतं.
  • नियमित स्ट्रॉबेरी खाल्ल्याने कोरडे डोळे, डोळ्यांमधील नसांना हानी पोहोचणे, डोळ्यांमध्ये दोष अशा समस्या बळावत नाहीत.

जर एवढे फायदे स्ट्रॉबेरी खाण्यामुळे होणार असतील तर, हे आरोग्यदायी फळ खाण्यास काहीच हरकत नाही.