मोटोरोला 5G फोन लॉंच; जाणून घेऊया किंमत-फीचर्स

0
317

Motorola ने भारतात Moto G 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने म्हटल्याप्रमाणे हा फोन सर्वात कमी किंमतीचा 5G स्मार्टफ़ोन असणार आहे. भारतात सध्या ५जी उपलब्ध नाही. परंतु, वर्ष – दोन वर्षात ५जी नेटवर्क येवू शकते. त्यामुळे युजर्संना ५जी स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास हा फोन उपयुक्त ठरू शकतो.

Moto G 5G सोबत कंपनी ऑफर्स सुद्धा देत आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ग्राहकांना या फोन खरेदीवर १ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. यासाठी HDFC बँकेच्या क्रेडिट कार्टवरून ग्राहकांना पेमेंट करावे लागणार आहे. Moto G 5G या फोनची विक्री भारतात ७ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. या फोनला फ्लिपकार्टवरून खरेदी करता येवू शकते. कंपनीने या फोनला ग्रे आणि सिल्वर कलर ऑप्शनमध्ये लाँच केले आहे.

किंमत
Motorola Moto G 5G ची किंमत २० हजार ९९९ रुपये आहे. यासोबतच एचडीएफसी बॅंक (HDFC Bank) कार्ड्सवर तुम्हाला १ हजार रुपयांचे इंस्टंट डिस्काऊंट देखील मिळणार आहे.

भारतात Motorola Moto G 5G खूप स्वस्त आहे. काही दिवसांपूर्वी हा फोन यूरोपमध्ये लॉंच केला गेला. मोटोरोला मोटो जी ५ जी यूरोपमध्ये २९९.९९ यूरोमध्ये (साधारण २६,३०० रुपये) लॉंच केला गेला. तर भारतात याची किंमत २० हजार ९९९ रुपये आहे. यूरोपमध्ये वॉलकेनो ग्रे, फ्रॉस्टेड सिल्वर रंगात उपलब्ध आहे.

फीचर्स
नव्या स्मार्फोनमध्ये मोटोरोला Qualcomm Snapdragon 750G SoC चा प्रोसेसर देतोय. OnePlus Nord मध्ये देखील याप्रकारचा प्रोसेसर देण्यात आलयं. Moto G 5G 64GB मध्ये इनबिल्ट स्टोरेज असेल. मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून १ टीबी पर्यंत ही मेमरी वाढवू शकता. या फोनमध्ये ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येवू शकतो. या फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. तसेच २० वॉटचा चार्जिंग सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये तीन रियर कॅमेरा दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स, दुसरा ८ मेगापिक्सलचा तर तिसरा २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.