Nokia ने सप्टेंबर मध्ये इंटरनेशनल मार्केट मध्ये आपले दोन कमी किंमत असलेले स्वस्त स्मार्टफोन Nokia 3.4 आणि Nokia 2.4 सादर केले होते. हे दोन्ही फोन अँड्रॉइड 11 अपडेट आणि शानदार स्पेसिफिकेशन्स सह मार्केट मध्ये आले होते जे आंतरराष्ट्रीय लॉन्च नंतर नोकियाच्या इंडियन वेबसाइट वर लिस्ट करण्यात आले होते. अनेक दिवस वेबसाइट वर राहिल्यानंतर आता वाटते आहे लवकरच हे फोन्स बाजारात पण विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
Nokia 2.4 ची किंमत :-
Nokia 2.4 ची विक्री नोकियाच्या अधिकृत वेबसाइटवरुन आजपासून सुरू झाली आहे. 26 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन ऑर्डर देणाऱ्या पहिल्या 100 ग्राहकांना जेम्स बॉन्ड 007 चं मर्चंडाइज हँम्पर दिलं जाईल. यात 007 स्पेशल एडिशन बॉटल, आणि मेटल की-चेनचा समावेश आहे. त्यानंतर चार डिसेंबरपासून हा फोन अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि अन्य रिटेल स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. हा फोन डस्क, एफजॉर्ड (Fjord) आणि चारकोल अशा तीन रंगांमध्ये खरेदी करता येईल. 10 हजार 399 रुपये इतकी फोनची किंमत ठेवण्यात आली आहे. या फोनची खासियत म्हणजे फोनमध्ये असलेली 4500mAh ची बॅटरी. ही बॅटरी दोन दिवसांचा बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे.
Nokia 2.4 स्पेसिफिकेशन्स :-
Nokia 2.4 मध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. फोनमध्ये MediaTek Helio P22 प्रोसेसर असून हा फोन अँड्रॉइड 10 वर कार्यरत असेल, तसेच नंतर Android 11 चा अपडेटही मिळू शकतो. फोनमध्ये गुगल असिस्टंटसाठी एक वेगळं बटण आहे. 3 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनचं स्टोरेज मेमरी कार्डद्वारे 512 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे.
फोटोग्राफीसाठी नोकिया 2.4 च्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डुअल सिम, 3.5एमएम जॅक, एनएफसी व 4जी वोएलटीई सोबतच सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 4,500एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन पण Dusk, Fjord आणि Charcoal कलर मध्ये लॉन्च झाला आहे.
नोकिया 2.4 मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेला 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आली आहे. अँड्रॉइड 10 ओएस सह हा फोन मीडियाटेक हीलियो पी22 चिपसेट वर चालतो. आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. नोकिया 2.4 चा बेस वेरिएंट 2 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी देण्यात आली आहे. Nokia 2.4 ची बेस किंमत 119 यूरो म्हणजे 10,000 रुपयांच्या आसपास आहे.
Nokia 3.4
नोकिया 3.4 19.5:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.39 इंचाच्या एचडी+ पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. अँड्रॉइड 10 आधारित हा फोन 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट वर चालतो. आंतरराष्ट्रीय बाजारात हा फोन 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजच्या तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे, ज्यांची सुरवातीची किंमत 159 यूरो म्हणजे 13,500 रुपयांच्या आसपास आहे.
फोटोग्राफी सेग्मेंटसाठी बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा यूडब्ल्यू सेंसर देण्यात आला आहे तसेच सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Nokia 3.4 मध्ये सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन पावर बॅकअपसाठी 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन Dusk, Fjord आणि Charcoal कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे