OnePlus 8T स्मार्टफोन 14 ऑक्टोबरला होणार लाँच

0
162

वनप्लस ८ टी(OnePlus 8T)शी संबंधित अनेक फिचर्स आतापर्यंत समोर आले आहेत. त्याचबरोबर कंपनीने टीझरद्वारे येणाऱ्या स्मार्टफोन वनप्लस ८ टी मध्ये ड्यूल सेल चार्जिंग सिस्टमसह यामध्ये नवीन Warp Charge तंत्रज्ञान वापरणार आहे. कंपनीने सोमवारी कन्फर्म केले आहे की, OnePlus 8T स्मार्टफोन येत्या १४ ऑक्टोबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. फोनला कंपनीने अॅमेझॉनवरून विक्री करणार आहे.

वनप्लसच्या वेबसाईटवर दिल्या गेलेल्या लँडिंग पेजवर वनप्लस ८ टी लाँच इंविटेशन दिले गेले आहे. तिथे ड्यूल सेल चार्जिंग सिस्टम दर्शविले जात आहे. हे पाहून असा अंदाज बांधता येता की, या स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला गेला आहे.

OnePlus 8T मध्ये मिळू शकतात हे फीचर
समोर आलेल्या रिपोर्टनुसार, OnePlus 8T मध्ये पंचहोल डिझाईन सोबत ६.५ इंचाचा एस अमोलेड डिस्प्ले दिला जावू शकतो. फुल एचडी रिझॉल्यूशन सोबत येणाऱ्या या फोनमध्ये डिस्प्ले मध्ये 120Hz चा रिफ्रेश रेट मिळू शकतो. फोनमध्ये कंपनी स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर ऑफर करू शकते. फोटोग्राफीसाठी क्वाड रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. फोनचा प्राइमरी सेंसर 48MP असू शकतो. तर 16MPचा सेकेंडरी सेंसर, 5MPचा मॅक्रो लेंस आणि 2MPचा पोट्रेट सेंसर दिले जाऊ शकतात. फोनमध्ये 16MPचा फ्रंट कॅमेरा असेल. पॉवर बॅकअपसाठी 4,500mAh बॅटरी उपलब्ध असू शकते. स्मार्टफोन नवीन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसरसह 8GB + 128GB आणि 12GB + 256GB या दोन व्हेरिएंटमध्ये बाजारात येणार आहे.

▪️ स्मार्टफोनला क्वाड कॅमेरा सेटअपसह प्राथमिक कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असणार आहे.

▪️ तसेच अन्य तीन कॅमेरे 16MP अल्ट्रा वाईड लेन्स, 5MP मॅक्रो लेन्स आणि 2MP कॅमेरा असतील.

▪️ सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 32MP कॅमेरा देण्यात येणार असून 4500mAh बॅटरी दिली दिली जाणार आहे.

दरम्यान, हा स्मार्टफोन Android 11 out-of-the-box वर आधारित नव्याने प्रसिद्ध झालेल्या Oxygen 11 OS वर चालणार आहे.