सिग्नल अ‍ॅप देतोय व्हाट्सअप अ‍ॅपला टक्कर

0
195

Whatsapp चे नवीन नियम आणि अटीमुळे युजर्संची डोकेदुखी वाढली. युजर्समध्ये आता भीती सुद्धा पसरली आहे. त्यामुळे अनेक जण दुसरा पर्याय शोधत आहेत. सध्या सिग्नल मेसेंजर (signal massenger) ला जगभरात पसंती मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत युजर्संची संघ्या झपाट्याने वाढत आहे. सिग्नल पर्सनल डेटा मागत नाही, केवळ तुमचा फोन नंबर स्टोर करतो. सिग्नलने डिसेंबर २०२० मध्ये आपले लेटेस्ट व्हर्जन सोबत एक ग्रुप कॉल लाँच केले आहे. सिग्नल पर्सनल डेटा म्हणून केवळ तुमचा फोन नंबर स्टोर करतो.

प्रथम जाणून घ्या Signal App
व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणे सिग्नल अ‍ॅप देखील एक मेसेजिंग अॅप आहे. या अ‍ॅपची खास गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत सर्व मेसेजेस त्यात एन्क्रिप्ट केलेले आहेत. म्हणजेच केवळ प्रेषक आणि प्राप्तकर्ता संदेश पाहिले जाऊ शकतात. इतर कोणतीही व्यक्ती संदेश पाहू शकत नाही. व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणेच या अ‍ॅपमध्ये फोटो, व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल आणि फाइट ट्रान्सफर देखील करता येते.

असे सिग्नल जॉइन करू शकता
सिग्नलवर सर्वात आधी एक ग्रुप बनवा
ग्रुप सेटिंग्सवर जा आणि ग्रुप लिंकवर टॅप करा.
ग्रुप लिंक क्रिएटसाठी टॉगल ऑन करा आणि शेयरवर टॅप करा.
यानंतर तुमच्या पंसतीच्या जुन्या मेसेंजर अॅपवर शेयर करा.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स कसे ट्रान्सफर कराल
प्राप्त माहितीनुसार, आपण प्रथम सिग्नलमध्ये (Signal App) एक नवीन ग्रुप तयार करणे आवश्यक आहे. आता या ग्रुपच्या सेटींग्स​​वर जा आणि ग्रुप लिंक्सवर क्लिक करा. ग्रुप लिंक ऑन करा आणि आपल्या जुन्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये (Whatsapp Group) ती लिंग शेअर करा. जेणेकरुन तुमचे फ्रेंड्स ती लिंग जॉईन करतील.