कोरोनाच्या विळख्यात बॉलिवूड अडकले; गायिका कनिका कपूरला कोरोना

0
505

संपूर्ण जगात करोना व्हायरची भीती पाहायला मिळते. अशातच सर्वजण स्वत:ला करोना होणार नाहीना यासाठी काळजी घेत आहेत. बॉलिवूड कलाकारांनी तर घराबाहेर पडणे टाळले आहे. एखाद्या भारतीय सेलिब्रिटीला कोरोनाची लागण झाल्याची पहिली घटना समोर आली आहे. बॉलिवूड गायिका कनिका कपूरला कोरोनाची बाधा झाली आहे. उत्तर प्रदेशात शुक्रवारी समोर आलेल्या 4 प्रकरणांमध्ये कनिकाचा समावेश आहे. तिला केजीएमयूच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे लंडन दौऱ्यावरून परतल्यानंतर गायिका कनिकाने कोरोना झाल्याचे लपवले होते. त्यानंतर तिने एक पार्टीही दिली. या पार्टीमध्ये बॉलिवूडचे जवळजवळ १०० सेलिब्रेटी सहभागी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये आता भीतीचे वातावरण परसले आहे. आता पार्टीमध्ये कोण सहभागी झाले होते आणि त्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी कनिका लंडनला गेली होती. तिकडून भारतात परतल्यावर तिने एका पार्टीमध्ये हजेरी लावली होती. या पार्टीत सहभागी झालेल्या 500 लोकांमध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचा मुलगा भाजप खासदार दुष्यंत सिंह यांचा देखील समावेश आहे.

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका कनिका कपूरला कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिने याबाबत इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. तिनेच आपल्याला कोविड -१९ झाल्याचे म्हटले आहे. कनिका आणि तिचे कुटुंब सध्या पूर्णपणे अलग ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांने तिच्या पोस्टच्या माध्यमातून दिली.

कनिका ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आहे. ‘बेबी डॉल’सोबतच तिने ‘बीट पे बूटी’, ‘टुकुर टुकुर’ ही गाणी गायली आहेत. काही रियलिटी शोमध्ये तीने परीक्षकाची भूमिका साकारली आहे.