कोरोनाविरोधी लढ्यासाठी ‘टिकटॉकही पुढे सरसावले

0
375

(मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत)

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. टिकटॉक कंपनीने (बाईटडान्स (इंडिया) टेक्नॉलॉजी प्रा. लि) कोविड विरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ कोटी रुपयांची मदत जमा केली आहे.

टीकटॉक इंडियाचे प्रमुख निखील गांधी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात पत्र पाठवून कोविड १९ विरुद्धच्या त्यांच्या लढ्याची माहितीही कळवली आहे. ते म्हणतात की, मुंबई आणि महाराष्ट्रात टिकटॉकच्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजारावर असून राज्याप्रतीच्या सामाजिक दायित्वाची त्यांना जाणीव आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने गृहविभागाला एक लाख मास्क उपलब्ध करून दिल्याची माहिती ही त्यांनी दिली आहे. या जागतिक आपत्तीमध्ये जबाबदार कॉर्पोरेट सिटिझन म्हणून कोविड १९ विषाणूविरूद्धच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी, सहकार्य करण्यासाठीच कंपनीने ही पावले उचलल्याचे गांधी यांनी म्हटले आहे.

टिकटॉकचा वापर करणाऱ्यांपर्यंत कंपनीने यायपूर्वीच कोरोनासंदर्भातील माहिती ऑनलाईन पद्धतीने पोहोचवत जनजागृतीही केली आहे. कोविड १९शी सुरु असणाऱ्या या युद्धात सहभागी होण्यासाठी टिकटॉक ॲपवर लाईव्ह डोनेशन जमा करण्याच्या व्यवस्थेसह या मदत कार्यात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

या आधीही टीकटॉक इंडियाने ४ लाख प्रोटेक्टीव्ह सूट आणि पंतप्रधानांच्या पीएम केअर्सला ३० कोटी रुपयांची देणगी दिली होती.