कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रात पहिला मृत्यू

0
324

कोरोनामुळे महाराष्ट्रातला पहिला मृत्यू झाला आहे. मुंबईत कस्तुरबा रूग्णालयात ६४ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. दुबईवरून प्रवास करून ते भारतात आले होते. ही व्यक्ती घाटकोपरला वास्तव्यास होती. कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी सकाळी त्यांचं निधन झालं. कर्नाटक, दिल्लीनंतर मुंबईत कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे महाराष्ट्रात मृत्यू झाल्याची ही पहिली घटना आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.

मुंबईत पहिला बळी गेल्याने आता महाराष्ट्रातील जनतेला आता आणखी काळजी घेण्याची गरज आहे. देशात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात हा कोरोनाच्या रुग्णांची वाढ होतान दिसत आहे. १७ मार्चला ८ नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात करोनाची लागण झालेल्या सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. केरळ, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्ये नवे रुग्ण सापडल्याने भारतातील एकूण करोना रुग्णांची संख्या १२७ वर पोहोचली आहे.