कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांचे हाल झाले आहेत. देशातील नागरिकांना या कठीण प्रसंगामध्ये अन्नधान्य आणि पैशांची चिंता सतावू नये यासाठी केंद्र सरकारकडून अत्यंत महत्तवाची घोषणा करण्यात आली त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून केंद्र सरकारतर्फे १ लाख ७० हजार कोटींची घोषणा केंद्र सरकारने जाहीर केली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली आहे. तसेच, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी ५० लाखाचे विमा संरक्षणही जाहीर करण्यात आले .या योजनेचा ३० लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
लॉकडाऊनने प्रभावित गरीबांना मदत केली जाईल. ज्यांना त्वरित मदतीची गरज आहे त्यांना दिलासा दिला जाईल. पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू केली जाईल.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 कोटी गरीब लोकांना 3 महिन्यांपर्यंत 10 किलो गहू किंवा तांदुळ आणि एक किलो डाळ देण्यात येईल. हे गहू आणि तांदूळ रेशनव्यतिरिक्त असेल, तसेच हे मोफत देण्यात येईल.
ज्यांना १५ हजारांपेक्षा कमी वेतन मिळते अशा कर्मचाऱ्यांच्या पीएफमधील सर्व भाग सरकार भरणार
गरीब वृद्ध, गरीब दिव्यांग आणि गरीब विधवांसाठी अतिरिक्त १ हजार रुपये मिळणार.
उज्ज्वला योजनेअंतर्गत ८ कोटी दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना तीन महिने मोफत गॅस मिळणार
उज्ज्वला योजनेअंतर्गत पुढील तीन महिन्यांसाठी मोफत सिलेंडर देणार
सरकार 3 महीने कर्मचाऱ्यांना ईपीएफ योगदान देईल. पूर्ण 24% सरकारकडून दिले जाईल. 100 कर्मचारी असलेल्या कंपन्यांना ईपीएफचा लाभ मिळेल.
100 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या संस्था, 15000 पेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना ईपीएफचा लाभ मिळेल. 80 लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना आणि 4 लाखांपेक्षा जास्त संस्थांना याचा फायदा होईल.
निर्माण क्षेत्रशी निगडीत 3.5 कोटी रजिस्टर्ड वर्कर जे लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत, त्यांनाही मदत दिली जाईल. यांच्यासाठी 31000 कोटी रुपयांचा फंड ठेवला आहे.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनीसुद्धा यावेळी सीतारमण यांच्या साथीने काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. ज्यामध्ये या युद्धपातळीवरील परिस्थितीमध्ये आरोग्यसेवांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचार्यांसाठी तब्बल ५० लाख रुपयांच्या आरोग्य विम्याची घोषणा करण्यात आली. जवळपास २० लाख कर्मचाऱ्यांचा विमा या योजनेअंतर्गत उतरवण्यात येणार आहे.
अन्नदाता अर्थात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची तरतूद करण्यात येणार आहे. ८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत. एप्रिल महिन्यात हे पैसे खात्यांवर जमा केले जातील असेही अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत हे पैसे जमा केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केले .