कोरोना संकट :लॉकडाउन 3 मे पर्यंत राहणार लागू, मोदींची घोषणा

0
275

देशाताली लॉकडाउन 3 मे पर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाउन 14 एप्रिल रोजी संपुष्टात आला. त्या पार्श्वभूमीवर सकाळी 10 वाजता पंतप्रधानांनी देशवासियांशी संवाद साधला. कोरोनाचे संकट लक्षात घेता आणि सगळ्यांच्या मागणीचा विचार करुन ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याची मोठी घोषणा मोदी यांनी यावेळी केली. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊन उठवले तर गंभीर परिणाम दिसून येतील, असे वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेने केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊन वाढल्याची घोषणा केली आहे.

कोरोनामुळे सुरु असलेला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. कारण लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्यांनी केलेल्या सूचनांनंतर करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. कोरोनाविरोधातल्या लढाईत आता कठोरता वाढवण्यात येणार आहे. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक गोष्ट बारकाईने केला जाईल. प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला जाईल. प्रत्येक क्षेत्राचे मुल्यांकन करण्यात येईल. जिथे कोरोनाचे रुग्ण कमी आढळतील, जिथे हॉटस्पॉट वाढणार नाही, अशा ठिकाणी २० एप्रिलनंतर काही काही सेवा सुरु केल्या जातील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘स्वतः कोणीही निष्काळजीपणा करायचा नाही आणि इतरांनाही कूर द्यायचा नाही. उद्या यासंदर्भात एक सविस्तर पत्रक जारी केलं जाईल. पंतप्रधानांनी सांगितलं की, ‘ज्या व्यक्तींच हातावर पोट आहे. ते माझे कुटुंबिय आहेत. माझ्या प्राथमिक कर्तव्यांमध्ये यांच्या गरजा पूर्ण करणं सर्वोच्च स्थानावर आहे. नव्या गाइडलाईन्स तयार करताना त्यांच्या हिताची काळजी घेतली जाईल. सध्या रबी पिकांच्या कापणीची वेळ आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र येऊन शेतकऱ्यांचा सर्व समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतील.

हे सात सप्तपदी लक्षात ठेवा:-

पंतप्रधान म्हणाले, माझे बोलणे समाप्त करण्यासाठी आपले सहकार्य मागत आहे.

  1. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्या. प्रामुख्याने ज्यांना जुने आजार आहेत त्यांची विशेष काळजी घ्या. त्यांना कोरोनापासून वाचवायचे आहे.
  2. लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मण रेषा यांचे पूर्णपणे पालन करा. घरात बनलेले फेस कव्हर किंवा मास्क लावणे बंधनकारक आहे.
  3. आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करा. गरम पाणी आणि काढा यांचे सेवन करा.
  4. कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी आरोग्य सेतु मोबाइल अॅप आवश्य डाउनलोड करा. इतरांनाही ते डाउनलोड करण्यासाठी प्रेरित करा.
  5. शक्य होईल तितक्या गरीब कुटुंबांची काळजी घ्या. त्यांच्या जेवण आणि आवश्यक गरजांची पूर्तता करा.
  6. आपल्या उद्योगात काम करणाऱ्यांशी सहानुभूती ठेवा. त्यांना नोकरीवरून काढू नका.
  7. स्वच्छता कामगार, पोलिस कर्मचारी, डॉक्टर्स यांना मान द्या त्यांचा सत्कार करा.

कोरोनाचा धोका ज्येष्ठ नागरिकांना आहे. या ज्येष्ठ नागरिकांना कोरोनापासून वाचवावं लागेल. लाॅकडाऊन लक्ष्मणरेषाचे पालन करा. घरात बनवलेल्या मास्कचा उपयोग करा. प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी आयुष्य मंत्रालयाच्या नियमांचे पालन करा. गरम पाणी, काढा वापरा. आरोग्यसेतू मोबाईल ॲप डाऊनलोड करा. गरीब कुटुंबांची भोजनाची गरज पूर्ण करा.नोकरीतून कोणाला काढू नका. कोरोना योद्धांचा सन्मान करा. तुम्ही त्यांचे दोन वेळा सन्मान केला आहात. त्याचा मला अभिमान आहे, असे मोदी म्हणाले.