चांगल्या आरोग्यासाठी रोज केळी खा आणि फिट राहा

0
678

आपण आपल्या दैनंदिन जीवनात दररोज फळांचे सेवन करत असतो. परंतु, केळी खाल्ल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात हे तुम्हाला माहितीये का? केळीमध्ये मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक अॅसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात.संशोधनातून हे समोर आले आहे की, दररोज तीन लहान केळी खाल्ल्याने जितकी एनर्जी मिळते तितकी 90 मिनिटे वर्कआउट केल्याने मिळते. मात्र केळ्यांनी केवळ एनर्जीच मिळत नाही तर तुम्ही फिट आणि हेल्दी राहता.

जाणून घेऊया केळी खाण्याचे नक्की फायदे:-

  • दोन केळी खाल्ल्याने शरीराला पुढील ९० मिनिटांपर्यंत उर्जा मिळते. मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते.
  • केळी खाण्याने ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये राहतो.
  • रिसर्चनुसार, केळी खाल्ल्याने डिप्रेशन दूर होते. केळ्यांमधील प्रोटीनमुळे केवळ मूड चांगला होतो.
  • ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास अथवा तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्यांचे सेवन करावे. केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
  • हृदय रोगाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी नियमित केळी खाणे अतिशय फायदेशीर ठरू शकत. केळी खाल्याने ह्रदयरोग होण्याची शक्यता कमी होते. तसेच यात लोहाचे प्रमाण जास्त असते.
  • केळीमध्ये खनिजे आणि व्हिटॅमिनचे प्रमाण असते. त्यामुळे ते लहान मुलांच्या विकासाठी अतिशय फायदेशीर आहे. तसेच केळीचे सेवन वयोवृद्धांसाठीही फायदेशीर ठरते. यात व्हिटॅमिन सी, बी आणि फायबर आढळतात.
  • केळ्याच्या नियमित सेवनाने पचनक्रिया सुरळीत राहते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी राखण्यास मदत होते.
  • रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम केळ करते.सकाळचा थकवा दूर करण्यासाठी केळी खाणे फायदेशीर ठरते.
  • केळ्यात आर्यन असते ज्यामुळे ऍनिमियाचा धोका टळतो. तसेच केळ्यातील व्हिटामिन बीमुळे रक्तातील ग्लुकोजवर नियंत्रण राहते.
  • ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी केळीचे सेवन केले पाहिजे, ज्यामुळे त्यांचे शरीर निरोगी आणि मजबूत राहील. केळीमुळे शारीरिक दुर्बलता कमी होईल आणि वजन वाढेल.
  • ज्यांच्या चेहर्‍यावर डाग आहेत त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी केळी खावी. त्यामुळे चेहर्‍यावर डाग , मुरूम गायब होतील आणि चेहरा चमकू लागेल.
  • केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेते. यामुळे हाडे मजबूत होतात.
  • अधिक मद्यपान केल्याने हँगओव्हर झाल्यास केळ्याचा शेक प्यायल्याने लवकर आराम मिळतो.