जनतेची सुरक्षा करणारेच कोरोनाच्या विळख्यात

0
382

राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला (Corona virus maharashtra police)आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. पोलीस अधिकारी आणि इतर कर्मचारीही 24 तास कार्यरत आहे. नागरिकांनी शासनाचे आदेश पाळून घरातच थांबावे व विनाकारण रस्त्यांवर फिरू नये यासाठी दिवसरात्र बंदोबस्तावर तैनात राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. 22 मार्च पासून ते आजपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार राज्यभरातील 11 पोलीस अधिकारी व 38 पोलिसांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाकडून मिळाली आहे. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

सरकारने लॉकडाऊन घोषित केले असले तरी नागरिक रस्त्यावर भाजीपाला असो वा किराणा खरेदीसाठी गर्दी करताना दिसत असतात. यावर अंकुश लावण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र काम करत आहे. पण आता त्यांनाही कोरोनाने ग्रासले आहे. नागरिकांची काळजी करताना त्यांची मात्र स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र पाहायला मिळतेय. अजून पुढेही हा आकडा वाढू शकतो त्यासाठी आपणही पोलिसांच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.

पहिली गोष्ट अशी आपण बाहेर न पडता घरी थांबावे. जरी बाहेर काही गोष्टी खरेदी करण्यास गेलो तर सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे.
बाहेर जाताना मास्क किंवा रुमाल बांधावा. जर ह्या गोष्टी आपण केल्या तर पोलिसांना आपले सहकार्य लाभेल आणि तेही कोरोनापासून सुरक्षित राहतील.

सरकारनेही पोलिसांसाठी आरोह्याच्या दृष्टीने सुरक्षा किट उपलब्ध करून द्यावे जेणेकरून ते बिनधास्त आपले काम करू शकतील. सध्या तरी डॉक्टर्स आणि पोलिसांकडे सरकारने प्रथम लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांची सुरक्षा ही जनतेची सुरक्षेसारखे आहे. ते आहेत म्हणून नागरिक घरात सेफ आहेत.