दुधी भोपळा खाऊया; निरोगी राहूया

0
363

बऱ्याच ठिकाणी आजकालच्या मुलांना दुधी भोपळा म्हटला की नाक मुरडायची सवय बघायला मिळते. बाहेरचे फास्ट फूड कसेही असेल ते खाणारच पण घरची कोणती भाजी म्हटली की नेहमी उत्तर नाहीच असते बरोबर ना? पण दुधी भोपळा खाल्ल्यावर होणाऱ्या फायदे ऐकले की तुम्हाला तो नक्की आवडू लागेल हे मात्र नक्की. दुधी भोपळा औषधी भाजी असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे आहेत.दुधी भोपळा आरोग्याशी निगडित अनेक समस्यांचे निवारण करण्यात फायदेशीर आहे.

  • दुधी भोपळ्याचे फायदे :-
  • जर आपण वाढत्या वजनामुळे त्रासले असाल तर व्यायामासोबत आपल्या खाण्यापिण्याकडे देखील लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे नियमित व्यायामानंतर दररोज १०० ग्राम दुधी भोपळ्याचा रस प्यायला हवे. हा रस प्यायल्याने बरेच तास आपले पोट भरल्यासारखे राहते व त्यामुळे भूक लागत नाही आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
  • हृदयविकाराच्या रूग्णांना दुधी भोपळ्याचा रस सकाळ-संध्याकाळ एक-एक वाटी दिल्यास रोहिण्यांमध‍ील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
  • आपण दुधी भोपळ्याचा रस प्या किंव्हा ह्या रसात तिळाचे तेल मिसळवून हे आपल्या केसांच्या मुळाशी लावल्याने केस गळती कमी होण्यास मदत होईल. तसेच आवळ्या च्या रसात दुधी भोपळ्याचा रस मिसळवून प्यायलाने केसातील कोंडा कमी होण्यास देखील मदत होते.
  • पचनक्रिये संबंधी आजकाल अनेक आजार होत आहेत. त्यामुळे दररोज सकाळी दुधी रस प्यायची सवय करावी. यातील फायबर आपले पचनक्षमता वाढवितात. ह्यात असलेले इलेक्ट्रोलाईट शरीरात पचन क्रियेत नियंत्रण ठेवून पोटाचे आजार कमी होतात.
  • ताण तणाव असल्यास दुधी लाभदायी ठरते. तसेच चेहऱ्याची सुंदरता वाढविण्यास देखील दुधी भोपळ्याचा रस मदत करतो.
  • शांत झोप येत नसेल तर अशा वेळी दुधी भोपळ्याच्या रसाने तयार केलेले तेल डोक्याला व तळपायाला लावावे. हे तेल बनविताना दुधी भोपळ्यासोबत त्याची पाने व फुलेही घ्यावीत. या तेलामुळे थंडावा निर्माण होऊन शांत झोप लागते.
  • खूप ताप आला असेल तर अशा वेळी दुधी भोपळ्याचे सूप पिणे हे एक उत्तम औषध ठरते. यामुळे ताप कमी होण्यास मदत होते. तसेच ताप चढत असल्यास दुधी किसून कपाळावर लेप लावावा.
  • हे नक्की लक्षात ठेवा:
  • दुधी भॊपळ्याचा रस तयार केल्यानंतर ते पिण्याआधी त्याची थोडी चव बघावी. आणि हा रस जर आपणास कडू लागल्यास त्याचे सेवन करू नये कारण यामुळे आपण उलटी, जुलाब व अस्वस्थ होऊ शकते.
  • कडू दुधी भोपळा हा गर्भवती महिलेसाठी अत्यंत हानिकारक असतो. ह्यामुळे गर्भपात देखील होऊ शकतो. स्तनपान करणाऱ्या महिलेने देखील कडू दुधी भोपळ्याचा रस पिऊ नये. कारण हा आपल्या व आपल्या बाळासाठी देखील योग्य नाही.