रुग्णवाहिका: मदतीला असते तात्काळ उभी

0
605

सध्या कोरोनाने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. रोजचे वाढत जाणारे आकडे आणि रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा सायरन ऐकू येत आहेत. रुग्णवाहिका दिसलीच की मनामध्ये चटका लागतो की आतमध्ये रुग्ण कसा असेल त्याला काही झाले तर नाही ना. याच रुग्णवाहिकेचा इतिहास आणि त्याबद्दल काही माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

रुग्णाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणाऱ्या साधनाला रुग्णवाहक म्हणतात. बहुधा हे साधन स्वयंचिलत वाहन असते. प्रथम घोडागाडी, नंतर मोटारगाडी व त्यानंतर हेलिकॉप्टर आणि विमानांचाही समावेश या साधनात झाला. अधिकाधिक उपयोग मोटारगाड्यांचा होत असल्यामुळे रुग्णवाहक मोटारगाडीला ‘रुग्णवाहिका’ (अँब्यूलन्स) हे नाव देण्यात आले. काही वेळेस रुग्णालयाबाहेरची वैद्यकीय सेवा देखील रुग्णवाहिकेत रुग्णाला पुरवली जाते. आपत्कालीन वैद्यकीय सेवांद्वारे रूग्णाला आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्यासाठी रुग्णवाहिका वापरल्या जातात. या कारणासाठी, त्यात सामान्यत: फ्लॅशिंग चेतावणी दिवे आणि सायरनसह लावलेले असतात. ते दृश्यासाठी पॅरामेडिक्स आणि इतर प्रथम प्रतिसादकर्ते द्रुतपणे वाहतूक करू शकतात, आपत्कालीन काळजी घेण्याकरिता उपकरणे बाळगू शकतात आणि रूग्णालयात रुग्णालयात किंवा इतर निश्चित काळजी घेतात. बहुतेक रुग्णवाहिका व्हॅन किंवा पिक-अप ट्रकसारखे वाहन वापरतात. इत

रुग्णवाहिका हा शब्द लॅटिन शब्द “एम्बुलेर” वरून आला आहे याचा अर्थ “फिरणे किंवा फिरवणे” असा आहे. या शब्दाचा मूळ अर्थ हालचाल करणारे रुग्णालय असा आहे. इ.स. १४८७ मध्ये ग्रॅनाडाच्या अमीरात विरूद्ध कॅथोलिक सम्राटांनी मलागाच्या वेढा घेण्याच्या वेळी स्पॅनिश सैन्याने आणीबाणीच्या वेळी वाहतुकीसाठी रुग्णवाहिका (स्पॅनिशमधील अंबुलन्सिया) प्रथम वापरल्या होत्या. अमेरिकन गृहयुद्धात जखमींना युद्धाच्या मैदानातून बाहेर हलवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिका वॅगन्स असे म्हणत. इ.स. १८७० फ्रॅंको-प्रुशियन युद्धाच्या आणि १८७६ च्या सर्ब-तुर्कीच्या युद्धाच्या वेळी फील्ड हॉस्पिटलना देखील रुग्णवाहिका म्हणत [६]. इ.स. १८५४ च्या सुमारास क्रिमीय युद्धाच्या वेळी वॅगनना प्रथमच रुग्णवाहिका म्हणून संबोधले गेले.

ग्णवाहिका या अर्थाचा इंग्रजी शब्द ‘अँब्यूलन्स’ हा असून तो मूळ लॅटिन शब्द ‘अँब्यूलेर’ यावरून बनला आहे. अँब्यूलेरचा अर्थ हालचाल करणे अथवा फिरणे असा असून त्यावरून आलेला ‘अँब्यूलंट’ हा शब्द ‘फिरते रुग्णालय’ या अर्थाने वापरला होता. आजही सैन्यदलात वापरण्यात असलेली ‘फील्ड अँब्यूलन्स यूनिट’ ही संज्ञा ‘फिरते रुग्णालय पथक’ या अर्थानेच वापरली जाते. प्रत्यक्ष वाहनात नंतर सुधारणा होत गेल्या. प्रथम वापरलेल्या चौचाकी घोडागाडीला कमानी स्प्रिंगा बसविलेल्या असल्यामुळे खाचखळग्यांतून जाताना रुग्णाला कमी त्रास होई. मोटारगाडीच्या वापरामुळे वेग व आराम या दोन्हींत वाढ झाली.

रूगणवाहिकाचे नांव उलटे का असते?

“मिरर इमेज” म्हणजे सुलट नाव आरशात उलट दिसते तर उलट नाव सुलट दिसते.याचाच उपयोग करून रस्त्याने रुग्णवाहिका म्हणजेच “Ambulance” जात असेल तर पुढील गाड्यांना संदेश मिळतो. जेंव्हा रूग्ण घेवून रुग्णवाहिका रस्त्याने निघते, तेव्हा “Ambulance” पुढे असलेल्या गाडीतील चालकाला गाडीच्या आरशात ते नाव “सुलट” दिसून त्याने “Ambulance” ला वाट करून द्यावी म्हणून असे केले जाते.

ड्राइव्हवरच्या डाव्या हाताच्या वरच्या बाजूला एक आरसा असतो त्यात मागून येणाऱ्या गाडीचे प्रतिबिंब दिसते त्यात त्याला समजते कि मागून कोणती गाडी येत आहे म्हणून रुग्णवाहिकेचे नाव उलटे लिहिलेले असते. परंतु जर नाव सरळ लिहिले तर समोरील आरश्या मध्ये ते दृश्य उलटे दिसेल म्हणून ते नाव उलट लिहले जाते.