- सेलिब्रिटी, राजकारण्यांना लगेच आयसीयू बेड्स कसे मिळतात
- आतातरी प्रशासनाला जाग यावी आणि जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे
गेला एक महिना रश्मी पवारचे वडील कोरोनाशी लढत होते. मात्र, संपूर्ण नाशिकमध्ये सुसज्ज हॉस्पिटलचा एक आयसीयू बेड मिळू शकला नाही. एका आयसीयू बेडसाठी रश्मीच्या परिवाराने मोठा संघर्ष केला. मात्र, नाशिकमधील अनेक मोठ्या हॉस्पिटल्सकडून त्यांना खोट्या आशेवर ठेवून शेवटच्या क्षणी आमच्याकडे बेड नसल्याचेच उत्तर दिले. ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी करावी लागलेली वणवण, हॉस्पिटल्सची चालणारी मनमानी हे सगळ त्यांच्या कुटुंबाला कसं सहन करावे लागले हे तिने या फेसबुक पोस्टमध्ये मांडलं आहे. एवढंच नाही तर सर्वसामान्यांना बेड्स मिळत नाहीत पण सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना लगेच बेड्स कसे उपलब्ध होतात? असा संतप्त प्रश्न या मुलीने विचारला आहे.
रश्मी पवारची फेसबुक पोस्ट
आमचा कोरोनाचा अनुभव…!!
ह्याला ‘अनुभव’ म्हणावं की नाही ह्याबद्दल मी साशंक आहे,कारण एका मुलीसाठी तिचा बाबा हे जग कायमचा सोडून जाणं ह्यापेक्षा कठीण अजून काय असू शकतं आयुष्यात..
माझ्यासारखे कित्येक जण आहेत आज बाहेर जे त्यांच्या वडिलांसाठी वणवण फिरताय..केवळ १ ICU बेड मिळावा म्हणून…बाहेर प्रचंड कठीण परिस्थिती आहे कोरोना रुग्णांची.. कुठे हॉस्पिटलची दयनीय अवस्था, ऑक्सिजन बेडचा तुटवडा,कुठे जागा असून सुद्धा रूग्णांना भरती करून देण्यास नकार,कुठे hospitals चे भरमसाठ आणि न परवडू शकणारे खर्च आणि अजून बरंच..
रूग्णाच्या मृत्यूनंतरही शरिराचे हाल होताहेत..
नाशिकच्या अमरधाममध्ये विद्युत दाहीनीसाठी सुध्दा ‘वेटींग’ आहे १०-१० तासांचं..
असं सगळं होत असून सुध्दा प्रशासन जागं का होत नाहीये हा मोठा प्रश्न आहे.
जेव्हा नाशिकमध्ये फक्त १२ रूग्ण होते तेव्हा lockdown होतं आणि आता जेव्हा दिवसाला १००० च्या पटीत रूग्ण संख्या वाढतेय तेव्हा सताड सगळं सुरू केलंय आणि लोकंही पिसाळल्यासारखी वागताय…
जोपर्यंत कोरोना आपल्या घरात येत नाही,तोपर्यंत त्याचं गांभीर्य आपल्याला समजणार नाही…
तो घरात येण्याची वाट बघू नका…
वेळीच सावध व्हा…
किमान आतातरी प्रशासनाला जाग यावी
आणि
जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे हिच अपेक्षा…
-रश्मी पवार (नाशिक)
youtube link:
https://l.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fyoutu.be%2FtFoJbChJRJE%3Ffbclid%3DIwAR1LZbsPTDtrSRbempjLZ-Ne0dnldy4tXAh3R1X0OUEWU7N9m6SsI_lZPFE&h=AT16IWr7shXfD4_AE-njEPWLYNEVynVb-CSq-HWL5g1iCrQNd3serDYRZQpG2wARTD7IlsofgYgJ9iLVHS_AztEQQaaoy3RIA2lpTjpXtbe2KwWhs6-5nuoDHqBXgbJp17rsf83l81p53hbu_Cw&__tn__=-UK-R&c[0]=AT3bJ7_I3HA1ekyJYLb2qYI64Q-qj52vN4m2u1udlGYWMPCvZ7C7xNt1jNsnroAQWxC8FJ0sAD13KE-RbeTd7KhUqNKm3BCmsZy0eaymF9GauB_uHBGOQdkJdb11BwstOuxv-dIaIbHS6vuvmeZWW6rW9LkPJg
खरेच रश्मीचा हा अनुभव ऐकून किती भयानक परिस्थिती सर्व महाराष्ट्रात आहे याचे टेंशन येत आहे. मागील आठवड्यात TV9 मराठी चॅनेलचा पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर जम्बो हॉस्पिटलमधील फालतू कारभारामुळे आपल्याला सोडून गेला. अशा घटना जर वारंवार होत असतील तर त्याला जबाबदार कोण आणि अजून किती जणांना ह्या भयानक स्थितीमुळे प्राण गमवावे लागणार आहे कोणास ठाऊक?
प्रशासनाने योग्य तो विचार आता करणे गरजेचेच बनले आहे तरच परिस्थिती सुधारू शकेल. नागरिकांचाही पूर्वीसारखा हॉस्पिटल्स आणि तेथील डॉक्टर्सवर विश्वास संपादन होईल.