काही जण प्रदूषणामुळे , कोंड्यामुळे तर काही तणावपूर्ण जीवनशैलीमुळे केसगळतीच्या समस्येशी झगडत असतात. तज्ञांच्या मते ,काही प्रमाणात होणारी केसगळती ठीक आहे मात्र जेव्हा ती दिवसाला ५०-१००केसांच्या वर जाते तेव्हा मात्र धोक्याची घंटा आहे. आपण विविध प्रकारचे शैम्पू कंडिशनर वापरुन कंटाळले असाल परंतु घाबरू नका कारण आज आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती टिप्स घेऊन आलो आहोत जे आपल्या केस गळतीपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. चला तर मग.
१. चेरी
हे फळ डोक्यावरील त्वचेचा पीएच स्तर संतुलित करते, जे केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहे. त्यात व्हिटॅमिन ए, बी, के आणि ई असते. ते केसांना पोषण तर प्रदान करतेच शिवाय केसांना आणि त्वचेला हायड्रेटेडही ठेवते.
असा करा वापर :
-एक मूठभर चेरी घ्या आणि मिक्सरमध्ये टाकून त्यांचा रस काढा.
-हा रस केसांच्या मुळांशी लावा आणि १ तासभर लावलेला राहू द्या.
-त्यामुळे केसांची मुळे रस चांगल्या प्रकारे शोषून घेतील. १ तासानंतर पाण्याने धुऊन घ्या.
२. कांद्याचा रस
कांद्यातील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते. कांद्याचा रस टाळूवर लावल्याने केसगळतीवर नियंत्रण मिळवता येते.
कसे कराल ?
– एक कांदा बारीक कापून त्याचा रस काढा
– रस टाळूवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा
– सौम्य शाम्पूने केस धुवा व ते वाऱ्यावर सुकू द्या
– आठवड्यातून दोनदा हा उपचार करून पहा
३. लसुण
कांद्याप्रमाणेच लसूण मध्येही ‘सल्फर’चे घटक असतात म्हणूनच पारंपारिक केस वाढीच्या औषधांमध्ये याचा वापर केल्याचे प्रामुख्याने आढळून येते .
कसे कराल ?
– लसणाच्या काही पाकळ्या ठेचून घ्या
– त्यात खोबऱ्याचे तेल घालून मिश्रण गरम करून घ्या
– मिश्रण थोडे थंड झाल्यावर केसांच्या मुळांशी लावा
– ३० मिनिटे तेल लावून ठेवा त्यानंतर केस धुऊन टाका
– असे आठवड्यातून दोनदा करा.
४. नारळ
केसांच्या वाढीसाठी तसेच त्याच्या देखभालीसाठी नारळ अतिशय उपयुक्त आहे. नाराळातील उपयुक्त मेद ,प्रोटिन्स व मिनरल्स केसांचे तुटण्याचे प्रमाण कमी करते. केस गळती रोखण्यासाठी नारळाचे दुध वा तेल अतिशय उपयुक्त ठरते.
कसे कराल ?
– नाराळाचे तेल गरम करून घ्या व केसाच्या मूळापासून टोकापर्यंत लावा
– तासाभराने केस धुऊन टाका
– किंवा खोबरं किसून त्याचे दुध काढून ते टाळूवर केस गळतीच्या जागेवर लावा
– रात्रभर ते राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुऊन टाका.
५. आवळा
केस गळतीने त्रस्त असलेल्यांसाठी ‘आवळा’ नक्कीच फायदेशीर ठरतो , त्यातील व्हिटामिन सी व एन्टीऑक्सिडन्ट गुण सुरवातीच्या टप्प्यातील केसगळती थांबवते.
कसे कराल ?
– आवळ्याचा अर्क अथवा पावडर लिंबाच्या रसात एकत्र करा
– हे मिश्रण केसांना लावून सुकू द्या
– केस कोमट पाण्याने धुऊन टाका
६. जास्वंद
जास्वंद केसांना पोषण देतात,केसगळती टाळतात तसेच केस अकाली पांढरे होण्यापासून बचावतात.
कसे कराल ?
– काही जास्वंदाची फुले कुटून तीळ अथवा खोबऱ्याच्या तेलात घालून मिश्रण एकत्र करा.
– हे मिश्रण काही तासांसाठी केसांना लावून ठेवा
– थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा .
७. मेथीचे दाणे :
मेथीच्या दाण्यांमध्ये प्रथिने आणि निकोटीनिक acid चे प्रमाण जास्त असते, जे केस गळणे पासून फायदेशीर ठरू शकतात.
– अर्धा कप मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा.
– पेस्ट बनवा आणि आपल्या केसांना लावा,
– 30-60 मिनिटे ठेवा आणि पाण्याने धुवा,
– आठवड्यातून एकदा हे करा.