Maharashtra covid 19 new guidelines : महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी! राज्य सरकारची नवी नियमावली

0
548

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री उशीरापर्यंत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आज (शनिवारी) कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात उद्या मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्या नियमावलीनुसार आता राज्यात 10 जानेवारीपासून रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू असणार आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदानं, उद्याने, चित्रपट गृहे, केशकर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे मुंबई लोकल प्रवासासाठी कुठलेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.

सर्वसामान्य नागरिकांसाठी नियमावली
राज्यात सकाळी जमावबंदी, तर रात्री 11 ते पहाटे पाच पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू

काय आहेत नियम?

  • रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी तर रात्री नाईट कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे.
  • राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.
    अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध
  • सरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना निषेध, आवश्यकता असल्यासच मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी आवश्यक
    प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम, 50 टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही
  • लग्न समारंभासाठी 50 जणांना परवानगी
  • अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी
  • सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी 50 जणांना परवानगी
  • 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद
  • स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद
  • हेअर कटिंगची दुकानं 50 टक्के क्षमतेने सुरू, रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार
  • पर्यटन स्थळं बंद, पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे
  • शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू
  • रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री 10 ते सकाळी 5 हॉटेल बंद राहणार आहे. होम डिलिव्हरी सुरु राहणार आहे
  • नाट्यगृह, सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. क्षमता बोर्डावर प्रदर्शित करावी.
  • नाट्यगृह, सिनेमागृहात संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच परवानगी मात्र रात्री 10 ते सकाळी 8 सिनेमागृहा बंद

सरकारी नोकरदारांसाठी नियमावली
लेखी आणि स्पष्ट परवानगीशिवाय सरकारी कार्यालयात लोकांना प्रवेश नाही
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करुन नागरिकांशी संवाद राखणे
एकाच कॅम्पसमधील किंवा बाहेरुन आलेल्यांसाठी व्हिडीओ कॉन्फरिन्सिंगद्वारे संवाद
कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करुन देणं, तसंच कार्यालयाच्या सोयीनुसार त्यांच्या कामाच्या तासात बदल करणे
सरकारी कार्यालयांमध्ये कोरोना नियमांचे तंतोतंत पालन व्हावे
थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे