हर्ड इम्युनिटी म्हणजे काय? ते कशाप्रकारे काम करते?

0
762

हर्ड इम्युनिटी म्हणजे , हर्ड म्हणजे कळप किंवा समूह. म्हणजे एकाध्या रोगाची साथ जेव्हा जास्तीत जास्त लोकांमध्ये पसरते तेव्हा तिची तीव्रता कमी होते. ह्यालाच हर्ड इमूनिटी म्हणजे समूह रोगप्रतिकार शक्ती असे बोलल जाते. त्यासाठी आपण असे समजून घेवू की ही immunity तयार होण्यासाठी जर १०० टक्के लोक पाहिजे असतील तर केवळ ७० टक्के लोकांमध्ये जरी ही रोग प्रतिकारक शक्ती असली तरी ही साथ आटोक्यात येवू शकते.

हर्ड इम्युनिटी हे एखाद्या साथीच्या आजाराविरुद्ध शरीरामध्ये प्रतिकारक शक्ती तयार होणे. साथीचा आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात त्या विशिष्ट व्हायरस च्या विरुद्ध प्रतिपिंडे म्हणजेच अँटीबॉडीज तयार होतात व व्हायरसला आळा बसतो. समाजात हर्ड इम्युनिटी तयार व्हायला खूप काळ जातो. यामुळे जास्ती जास्त लोकांना व्हायरसची लागण होऊन त्यांच्यामध्ये व्हायरसविरोधी सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होणे. तज्ज्ञांच्या मते, जवळपास 60 ते 65 टक्के लोकसंख्या कोरोना संक्रमित झाल्यानंतर हर्ड इम्युनिटी विकसित होईल. यामुळे कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाची साखळी तुटेल, कोरोना संक्रमणाची नवीन प्रकरणं दिसणार नाहीत.

जवळपास शंभर वर्षांपूर्वी हर्ड इम्युनिटी ही संकल्पना जगासमोर आली. पण त्याचा वापर गेल्या १० वर्षांत वाढला. सध्या कोरोना वायरसच्या काळात तर हर्ड इम्युनिटी सगळ्या जगभर गाजली. ‘एखाद्या देशात किंवा समाजात पुरेशा लोकांकडे रोगप्रतिकारक शक्ती असली की त्या साथरोगाचा झपाट्याने प्रसार होत नाही. कारण, त्या आजाराविरोधातली रोगप्रतिकारक शक्ती लोकांकडे असल्याने लोक आजारी पडत नाहीत. अशी परिस्थिती आली तर त्या देशात हर्ड इम्युनिटी येते.’ असं वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. पॉल हंटर यांनी डीडब्लू न्यूजच्या एका वीडियोमधे सांगितलंय.

अखेरचा पर्याय आहे हर्ड इम्युनिटी
हर्ड इम्युनिटी याला अखेरचा पर्याय म्हणून बघितलं जातं. कुठल्याही नवीन व्हायरससोबत लढण्यासाठी आणि त्याविरोधात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे त्याची लस तयार करणं होय. व्हायरसविरोधात जर लस निर्माण करता आली तर ती माणसाला देऊन त्यांची अँटीबॉडी वाढवता येते. लस किंवा वॅक्सिन घेतल्यानंतर माणसाचं शरीर त्या व्हायरसमुळे संक्रमित होऊ शकत नाही आणि ते सुरक्षित राहतात. लस विकसित झाली नाही तर व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग सारखे उपाय केले जातात. हा उपाय केल्यानंतरही जर संक्रमण पसरलंच तर हर्ड इम्युनिटीकडे जाण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. मात्र त्याचे काही वेगळे संकटं आहेत.

स्वीडन करतेय हर्ड इम्युनिटीसाठी प्रयत्न

ही हर्ड इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती दोनच मार्गांनी मिळवता येते. एकतर, त्या वायरसची लस घेतली असेल तर किंवा त्या वायरसची लागण होऊन आपण त्यातून बरं झालो असू तर. आता हा कोरोना वायरस नवा असल्याने अजूनही या वायरसविरोधातली लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मिळवण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे कोरोना वायरसची लागण होऊन त्यातून बरं होण्याचा एकमेव मार्ग आपल्याजवळ उरतो.

म्हणूनच ही हर्ड इम्युनिटी मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या स्वीडनने आपल्या देशात लॉकडाऊन केलेला नाही. लस उपलब्ध नसल्याने जास्तीत जास्त लोकांना कोरोनाचं संक्रमण होऊन ते त्यातून बरे व्हावेत यासाठी स्वीडन प्रयत्न करतो आहे. त्याचे शेजारी म्हणजे, डेन्मार्क, नॉर्वे या देशांनी कोरोना वायरसपासून बचाव करण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन केलाय. पण लॉकडाऊन ही एक हस्यास्पद गोष्ट आहे, असं स्वीडनचे साथरोगतज्ञ डॉक्टर अन्डर्स टेग्नेल यांनी बीबीसी इंग्लीशला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

कुठल्याही देशात आरोग्य मंत्रालय हे सरकारच्या अधीन असतं. पण स्वीडनमधे ही संस्था स्वायत्त आहे. तिथं त्याला पब्लिक हेल्थ एजन्सी असं म्हणतात. सार्वजनिक आरोग्याबाबतचे सगळे निर्णय या संस्थेकडून घेतले जातात आणि ही संस्था जे निर्णय घेईल ते सरकारला मान्य करावे लागतात.