वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे : आज जगभरात साजरा केला जातो वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे

0
532

ब्रेन ट्यूमर हा आजार झाल्याचे लवकर समज नाही. अनेकदा या आजाराचे निदान उशीरा झाल्याने प्रकृती बिकट होते. अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. या आजाराबाबत लोकांना माहिती सविस्तर माहिती नसते. आज ८ जूनरोजी वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे आहे. लोकांमध्ये ब्रेन ट्यूमरबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असल्याने आपण या आजाराची माहिती घेणार आहोत. तसेच लक्षणे जाणून घेणार आहोत.

ब्रेन ट्यूमरची समस्या गेल्या काही वर्षांपासून दिवसेंदिवस वाढत जात आहे. रेडिएशनच्या संपर्कात असणारे किंवा सतत धुम्रपान करणाऱ्यांमध्ये ब्रेन ट्यूमरचा सर्वाधिक धोका असतो. वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डेच्या दिवशी ब्रेन ट्यूमरविषयी जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजित केले जातात किंवा अनेक ठिकाणी रॅली काढल्या जातात. जगात पहिल्यांदा जर्मनमध्ये वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डेचे आयोजन केले गेले होते.

ब्रेन ट्यूमर म्हणजे काय?
मेंदूमध्ये असामान्य पेशी वाढू लागतात ज्याला ब्रेन ट्यूमर असे म्हणतात. मेंदूच्या पेशींमध्ये विलक्षण वाढ होते आणि तिथे एक गाठ तयार होते. ब्रेन ट्यूमरच्या आजाराला हलक्यात घेऊ नये कारण बऱ्याचदा ब्रेन ट्यूमरची गाठ पुढे जाऊन कॅन्सरची गाठ ठरु शकते. त्यामुळे ब्रेन ट्यूमरची लक्षणे माहिती करुन घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यानंतर त्यावर योग्य उपचार करणेही महत्त्वाचे आहे.

ब्रेन ट्यूमरची लक्षणे काय?

  • बऱ्याचदा डोळ्यांना धुरकट दिसणे. एखादी वस्तू पाहण्यासाठी अडथळा येणे.
  • सकाळी उठल्यावर तीव्र डोके दुखी होणे. सतत बेशुद्ध होणे हे देखील ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते.
  • अचानक घाबरल्यासारखे होणे. उलटी होणे.
  • दररोजच्या कामांत गोंधण उडणे. वागण्या बोलण्यामध्ये बदल जाणवणे.
  • ऐकण्यासाठी अडथळा येणे.

भारतात दरवर्षी ४० ते ५० हजार लोकांना ब्रेन ट्यूमर हा आजार झाल्याचे निदान होते. धक्कादायक म्हणजे यामध्ये सर्वात जास्त संख्या ही लहान मुलांची असते. लहान मुलांमध्ये ब्रेन ट्यूमर होण्याची टक्केवारी ही साधारण २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ट्यूमर कोणत्या ठिकाणी आहे, त्यानुसार त्याची लक्षणे असतात. जर ट्यूमर डोळ्यांना आणि हात-पायांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूच्या भागात असेल तर व्यक्तीच्या या अवयवांमध्ये कमजोरीची लक्षणे आढळतात. डोकेदुखी हे ट्यूमरचे सुरूवातीचे लक्षण असते.

ही सततची डोकेदुखी एखाद्या मोठ्या ट्यूमरदरम्यान होते. ही समस्या ट्यूमरच्या सुरूवातीच्या स्टेजमध्ये होत नाही. चालताना अचानक झटका लागणे हे देखील या आजाराचे एक लक्षण आहे. कोणत्याही प्रकारच्या ट्यूमरचे हे प्राथमिक लक्षण आहे. मेंदूमध्ये असलेल्या ट्यूमरमुळे न्यूरॉन्स अनियंत्रित होतात. यामुळे व्यक्तीची हालचाल असामान्य होऊ शकते. यामुळे संपूर्ण शरीरासोबतच एखाद्या अवयवात झटका येऊ शकतो. तसेच अचानक तोल बिघडणे हेसुद्धा या आजाराचे एक लक्षण आहे.

कधी कधी धुसर दिसणे, दोन गोष्टी दिसणे किंवा एकाएकी डोळ्यांची दृष्टी काही वेळासाठी दूर होणे हे ट्यूमरचे लक्षण आहे. अनेकदा तरगंती चिन्हेही दिसू शकतात. तसेच जर एखादी वस्तू निट उचलू शकत नसाल, पायऱ्या सहजपणे चढू शकत नसाल, तुमचा तोल बिघडत असेल तर ही लक्षणे धोकादायक आहेत. बोलणे, गिळणे आणि चेहऱ्याचे हावभाव नियंत्रण न करता येणे हे सुद्धा याचेच लक्षण आहे. तसचे एखादा अवयव सुन्न पडणे हेदेखील ब्रेनट्यूमरचे लक्षण आहे. जर शरीराचा एखाद अवयव किंवा चेहरा सुन्न पडला असेल किंवा तुम्हाला काहीच जाणवल्यास डॉक्टरांकडे जावे.